रस्त्यावरील चरी देताहेत अपघाताला निमंत्रण

कराड  – उंडाळे ते तुळसण फाटा या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यात ठिकठिकाणी पडलेले खड्डे व पाईपलाईनसाठी खुदाई केलेल्या चरी अपघाताला निमंत्रण देत आहेत. बांधकाम विभाग या रस्त्यावर अपघात होण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे उंडाळे ते तुळसण फाटा हा रस्ता शेतकऱ्यांनी आपली जमीन देऊन केला. यासाठी माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले होते. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची एकवेळ डागडुजी करण्यात आली. पण गेल्या काही वर्षात डागडुजी झालेली नाही.

या रस्त्यावर मोठ-मोठ्ठे खड्डे पडले असून रस्त्याच्या कडेने झाडे-झुडपे वाढल्याने हा रस्ता अडचणीचा बनला आहे. तसेच दोन ठिकाणी पाईपलाईनसाठी चरी खोदलेल्या आहेत. यापैकी एक चर अगदीच वळणावर आहे. वळणावरच चर असल्याने वाहनधारकाला यात सरीचा अंदाज येत नाही व वाहन जोरदार येऊन त्या खड्ड्यात आपटते. दुसरी चर थोड्या फार अंतरावर आहे. ही चर रस्ता केल्यापासून तशीच आहे. या चरीची जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कधीही डागडुजी केलेली नाही. काही लोकांनी चरीत माती टाकून मुजवण्याचा प्रयत्न केला. पण आजही ती सर तशीच पडून आहे.

बांधकाम विभागाने तिसरी असणारी चर गेल्या तीन-चार महिन्यात बुजवली. पण दोन मोठ्या चरी दिसल्या नाहीत.
या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते. पण हाच रस्ता बांधकाम विभागाने उपेक्षित ठेवला आहे. असून जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष देणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी हा रस्ता आत्ता आमच्याकडे हस्तांतरित झाला आहे. यापूर्वी तो दुसऱ्या विभागाकडे होता असे सांगतात. पण हस्तांतर झाल्यानंतर तरी रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे होते अशीही चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)