इस्लामी सहयोग संघटनेत भारताचा प्रथमच प्रवेश-सुषमा स्वराजना आमंत्रण

नवी दिल्ली – इस्लामी सहयोगी संघटना-ओआयसी (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन) मध्ये भारताचा प्रथमच प्रवेश झाला आहे. पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातेची राजधानी अबूधाबी येथे होणाऱ्या बैठकीसाठी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ओआयसीने खास अतिथी म्हणून आमंत्रण दिले आहे. सुषमा स्वराज ओआयसीच्या मंत्रिपरिषदेच्या उद्घाटन समारंभात भाषण करणार आहेत.

अबूधाबी येथे होणाऱ्या ओआयसीच्या 46 व्या सत्रासाठी संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांनी सुषमा स्वराज यांना आमंत्रित केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ओआयसीचे आमंत्रण स्वीकारण्यास भारताला आनंद होत असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. 18.5 कोटी मुस्लिम असलेल्या भारताला ओआयसी स्वागत योग्य मान्यता देत असल्याचा आनंद होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मुस्लिम लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक़ आहे. या आमंत्रणाकडे यूएईच्या प्रबुद्ध नेतृत्वाच्या सदिच्छेच्या रूपात आम्ही पाहतो. आणि त्याबद्दल यूएईचे आभार मानतो. आमचे वाढते द्विपक्षीय संबंध आणखीनच वाढून बहुपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक सच्ची मैत्री सिद्ध होईल, असे निवेदनात पुढे म्हटले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)