पश्‍चिम महाराष्टातील गुंतवणूकदारांची फसवणूक

मेकर कंपनीत 54 कोटींचा घोटाळा उच्च न्यायालयात याचिका

मुंबई – पश्‍चिम महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या ठेवी घेऊन सुमारे 54 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मेकर कंपनी विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या घोटाळ्याची आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागामार्फत तपास करावा. तसेच कंपनीचे प्रवर्तक रमेश वळसे-पाटील (पुणे) आणि इतर संचालकांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. गुंतवणूकदार संजय केरवा आणि अन्य 94 ठेवदारांच्या वतीने ऍड. धैर्यशिल सुतार यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी व न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासुमोर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात मेकर कंपनीने शेती व इतर बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूकीच्या विविध योजना जाहिर करून गुंतवणूकदारांना मोठ्या लाभाचे आमिष दाखविले. कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगांव भागातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी त्यात ठेवली जमा केल्या. मात्र मुदत संपल्यानंतर गुंतवणूकीदारांना ठेवी देण्यास कंपनीचे प्रवर्तक रमेश वळसे-पाटील व इतर संचालकांनी टाळाटाळा करण्यास सुरूवात केली. दरम्यान, कंपनीने कोल्हापूरच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्या विरोधात गुंतवणूकदारांनी कंपनीचे प्रमुख रमेश वळसे-पाटील व इतर 24 जणांवर महाराष्ट्र गुंतवणूकदार हित रक्षण कायदा 1999 प्रमाणे पोलीस ठाण्यात तक्रारी केली. गेल्या तीन महिन्यांत आर्थिक गुहे अन्वेशण विभागाने संचालकांविरोधात कोणतीच कारवाई केली नाही.

-Ads-

उलट कंपनींच्या प्रर्वतकाला आणि संचालकांना पाठीशी घातले जात आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच आर्थीक गुन्हे अन्वेषण विभाग योग्य प्रकारे तपास करत नसल्याने विशेष तपास पथक स्थान करावे अथवा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे तपास सोपविण्यात यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याचे लक्षात येता कंपनी विरोधात महाराष्ट्र गुंतवणूकदार हित रक्षण कायदा 1999 प्रमाणे पोलीस ठाण्यात तक्रारी केली. आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला. मात्र आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक कुमार कदम हे आरोपींची चौकशी न करता फिर्यादीनाच त्रास देत असल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)