पी नोटस्‌च्या माध्यमातून गुंतवणूक वाढू लागली

नवी दिल्ली – एप्रिल महिन्यात पी नोटच्या माध्यमातून गुंतवणूक वाढून 81 हजार 220 कोटी रुपयांवर गेली आहे. ही गुंतवणूक शेअरबाजार, रोखेबाजार आणि डेरिवेटिव्ह क्षेत्रात झालेले आहे.

यातील 58,220 कोटी रुपये शेअरबाजारात 21,542 कोटी रुपये रोखेबाजारात तर 123 कोटी रुपये डेरिवेटिव्ह बाजारात गुंतविण्यात आलेले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 78 हजार 110 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्यापेक्षा आता झालेली गुंतवणूक 3.98 टक्‍क्‍यांनी जास्त आहे.

नवे सरकार गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आगामी काळाबाबत आम्ही आशावादी आहोत, असे डब्ल्यूजीसी मालमत्ता व्यवस्थापन संस्थेचे मुख्य गुंतवणूक अधिकारी राजेश छेरुऊ यांनी सांगितले. एप्रिल 2017 नंतर सेबीने काही नियम केल्यामुळे ही गुंतवणूक कमी होती. मात्र, आता या माध्यमातून गुंतवणूक वाढत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)