सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत यंदा 29 कोटी 50 लाखाची गुंतवणूक 

कोल्हापूर –  जिल्ह्यात पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरु केलेल्या सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यातील 563 पोस्ट ऑफिसमधून 62 हजार 91 मुलींच्या नावांची खाती उघडून 29 कोटी 50 लाखाची रक्कम जमा झाली असल्याची माहिती वरिष्ठ डाकघर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी आज येथे बोलताना दिली.

सुकन्या समृध्दी योजनेस जिल्ह्यात उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत असून या योजनेतंर्गत 10 वर्ष वयाच्या आतील मुलींच्या नावे सुकन्या समृध्दी खाते काढता येते. ही योजना मुलींचे शिक्षण आणि लग्नासाठी गुंतवणूकीचा सर्वोत्तम, सुरक्षित आणि योग्य पर्याय असल्याचेही सांगून वरिष्ठ डाकघर अधीक्षक ईश्वर पाटील म्हणाले, लहान मुलीच्या नावे त्या मुलीचे पालक किंवा कायदेशिर पालक हे खाते सुरु करु शकतात, पालकांना त्यांच्या एका मुलीच्या नावे एकच खाते उघडता येते व दोन मुलींच्या नावे जास्ती जास्त दोन खाती उघडता येतात.

सुकन्या समृध्दी योजनेत खाते उघडल्यापासून केवळ 14 वर्षापर्यंत रक्कम जमा करावयाची असून योजनेचा कालावधी 21 वर्षे अथवा मुलीच्या लग्नापर्यंत आहे. कमीत कमी 250 रूपये जमा करून खाते उघडता येते. सुकन्या समृध्दी योजनेचे खाते जिल्ह्यातील कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये उघडावे, असे आवाहनही वरिष्ठ डाकघर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)