नवी दिल्ली – स्टुडंट हाऊसिंग क्षेत्रात 2018 मध्ये100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक झाली. भारतातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता ही बाजारपेठ 50 अब्ज डॉलरची होऊ शकते, असे नाईट फ्रॅंक या संस्थेने म्हटले आहे.
या क्षेत्रात मागणी आणि पुरवठ्यातील तूट तब्बल 80 लाख बेडची आहे. देशात सध्या 34 दशलक्ष विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमात नोंदणी केलेली आहे. त्यातील 70 टक्के विद्यार्थी 10 मोठ्या शहरात राहतात त्यांच्यासाठी आता फक्त 1.6 दशलक्ष बेडची व्यवस्था आहे. यासाठी काही विकसक प्रयत्न करीत असून त्यांना शंभर दशलक्ष डॉलरची गुंतवणूक मिळालेली आहे.
विकसित देशाप्रमाणे भारतातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे त्यासाठी विकसकांनी आणि सरकारने विद्यार्थ्यांच्या निवासासाठी समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज आहे असे नाईट फ्रांक संस्थेचे विद्यार्थी विभाग प्रमुख जेम्स फुलर व नाइट फ्रॅंकचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी सांगितले.