पुलवामा हल्ल्याचा तपास “एनआयए’कडे

संग्रहित छायाचित्र...

नवी दिल्ली – पुलवामा इथे “सीआरपीएफ’च्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने बुधवारी औपचारिकपणे स्वीकारली. स्थानिक पोलिसांनी 14 फेब्रुवारीला झालेल्या या भीषण आत्मघातकी स्फोटासंदर्भात अवंतीपोरा पोलिस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली होती. “एनआयए’ने हे प्रकरण आपल्याकडे नव्याने नोंदवून घेतले आणि “एनआयए’च्या पथकाने या हल्ल्याच्या तपासास सुरुवातही केली आहे, असे “एनआयए’च्या प्रवक्‍त्यांनी सांगितले.

“एनआयए’चे महासंचालक वाय.सी. मोदी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. स्थानिक पोलिस आणि “सीआरपीएफ’च्या अधिकाऱ्यांनी त्यांना स्फोटासंबंधीची प्राथमिक तपासाची माहिती दिली. “एनआयए’ने या ठिकाणी केलेल्या तपासादरम्यान स्फोटक साहित्य आगोदरच जमा केले आहे. याशिवाय सुमारे डझनभर लोकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी जमा केलेले पुरावेही “एनआयए’ने ताब्यात घेतले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोमवारी पुलवामामधील पिंग्लान भागात 16 तास चाललेल्या मोहिमेदरम्यान जैश ए मोहम्मद संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे तिघेही पुलवामाच्या हल्ल्याच्या कटात सहभागी होते, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)