वढेरा-भंडारी यांच्यातील संबंधांची चौकशी करा – भाजप सदस्यांची संसदेत मागणी

नवी दिल्ली – शस्त्रास्त्रांचा दलाल संजय भंडारी आणि सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यातील संबंधांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आज भाजपच्या सदस्यांनी संसदेत सरकारकडे केली. भाजपचे निशीकांत दुबे यांनी हा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की पिलातुस विमाने खरेदी प्रकरणातील मलिदा कोणापर्यंत पोहचला याचीही चौकशी सरकारने केली पाहिजे.

पिलातूस विमानांची खरेदी युपीए सरकारच्या काळात झाली होती. आणि त्यात संजय भंडारी याला मलिदा मिळाला असल्याचा संशय आहे. याची सध्या चौकशी सुरू आहे. त्यातून मिळालेल्या पैशातूनच लंडन मध्ये बेनामी प्रॉपर्टी घेतली गेली असाही आरोप त्यांनी केला. रॉबर्ट वढेरा यांच्या लंडन मध्ये अनेक बेनामी संपत्ती असल्याचा दावाहीं दुबे यांनी केला.

यावेळी रॉबर्ट वढेरांचे नाव घेण्यास कॉंग्रेस सदस्यांनी आक्षेप घेतला त्यानंतर सभापतींनी त्यांचे नाव रेकॉर्ड वरून काढून टाकण्याचा आदेश दिला. लंडन, बिकानेर आणि फरीदाबाद येथील बेनामी जमीनी कोणाच्या नावावर आहेत याचीही चौकशी सरकारने केली पाहिजे अशी मागणीही दुबे यांनी केली. या विमान खरेदी प्रकरणातील संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)