मोदींच्या हेलिकॉप्टरमधून आणलेल्या काळ्या बॉक्सची चौकशी करा – काँग्रेस

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरात आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. काँग्रेस पक्षाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ एक काळा बॉक्स गाडी मध्ये ठेवताना दिसत आहे. यावर काँग्रेस पक्षाने आरोप करत कर्नाटक मधील चित्रदुर्ग येथे नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टर मधून हा काळा बॉक्स एका गाडीमध्ये ठेवला असून, ती गाडी मोदींच्या ताफ्यातील नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.

https://twitter.com/INCIndiaLive/status/1117327396980449280

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)