देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा सुधारित अर्थसंकल्प सादर

सर्वसाधारण सभा : अंतिम मान्यतेसाठी संरक्षण विभागाकडे पाठविणार

कचरा उचलण्याचा ठेका नवी मुंबईच्या कंपनीला

बोर्डाच्या हद्दीतील सातही वॉर्डात (लष्करी हद्द वगळून) स्वच्छतेची सर्व कामे करणे तसेच सार्वजनिक कुंड्यांतील कचरा वाहतूक करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदांनुसार नवी मुंबई येथील डी. एम. एंटरप्रायजेस या संस्थेच्या सर्वात कमी दराच्या निविदेस मान्यता देण्यात आली आहे. त्याकरिता संबंधितास दरमहा 37 लाख 90 हजार 248 रुपये देण्यात येणार आहे. तसेच बोर्डाच्या मालकीच्या विविध इमारतींच्या सुरक्षेसाठी एकूण 44 सुरक्षारक्षक नेमण्याच्या बक्षी सेक्‍युरिटी या संस्थेने सादर केलेल्या निविदेस मान्यता देण्यात आली.त्याकरिता दरमहा 13 लाख 48 हजार 496 रुपये देण्यात येणार आहेत.

देहुरोड – देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत यंदाचा वार्षिक (2019-20) च्या सुधारित अर्थसंकल्प तसेच आगामी (सन 2020-21) चा मूळ अर्थसंकल्प सभेत प्रशासनाकडून सादर करण्यात आला. दोन्ही अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी पुण्यातील संरक्षण विभागाच्या प्रधान संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. सन 2019-20 च्या सुधारित अर्थसंकल्पात सरकारी अनुदानासह 130 कोटी 5 लाख 10 हजार 915 रुपये उत्पन्न दाखविण्यात आले आहे. 118 कोटी 56 लाख 500 रुपये खर्च प्रस्तावित आहे. तर सन 2020-21 च्या मूळ अर्थसंकल्पात सरकारी अनुदानासह 160 कोटी 92 लाख 60 हजार 400 रुपये उत्पन्न दाखविण्यात आले आहे. त्यानुसार 146 कोटी 43 लाख 49 हजार रुपये खर्च प्रस्तावित आहेत.

सभेत बोर्डाच्या हद्दीतील साफसफाईसह कचरा उचलण्याचा ठेका नवीन ठेकेदारास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरिता दर महिना 37 लाख 90 हजार 248 रुपये खर्च होणार आहे. बोर्डाच्या विविध इमारतींच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमण्याचा ठेका पुन्हा जुन्याच ठेकेदारास देण्याचा निर्णय घेत त्याकरिता दर महिना 13 लाख 48 हजार 496 रुपये खर्ची होणार आहेत.
कॅंटोन्मेंट बोर्डाची सर्वसाधारण सभा नवनियुक्‍त ब्रिगेडियर संजय खन्ना यांच्या अध्यक्षतेत पार पडली. नवनियुक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे, सदस्य रघुवीर शेलार, गोपाळराव तंतरपाळे, विशाल खंडेलवाल, ललित बालघरे, ऍड. अरुणा पिंजण, लष्करी सदस्य कर्नल एन. पी. पाटणकर, कर्नल पल्लव सूद, कर्नल विकास वर्मा, बोर्ड कार्यालय अधीक्षक, अभियंता, महसूल अधीक्षक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)