#Video : पर्यटनाचा आनंद घेतानाच स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घ्या – तेजस्वी सातपुते

सातारा – सातारा शहरात कास, ढोसेघर , महाबळेश्वर अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की अशाठिकाणी निसर्ग पर्यटनाला देखील उधाण येत. गेल्या काही दिवसांपासून सातारा शहर व ग्रामीण परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक निसर्गरम्य ठिकाणी आणि धबधब्यांवर राज्यातून अनेक पर्यटक येत आहेत.

पावसामुळे सातारा जिल्ह्यात दरड कोसळणे, रस्ता खचणे, झाड पडणे अशा घटना घडताना दिसत आहे. तसेच अशा प्रसिद्ध ठिकाणी तरुणांची हमखास गर्दी पाहावास मिळते. डोंगरकपार्‍यातून वाहणार्‍या धबधब्यांची ओढ पर्यटकांना असते. पर्यटनांचा आनंद घेताना अनेक लहान-मोठे अपघात घडतात.

अशावेळी पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी कशाप्रकारे काळजी घ्यावी तसेच पोलीस प्रशासन कशाप्रकारे सज्ज आहे ,याबाबत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दैनिक प्रभातच्या माध्यमातून पर्यटकांना आवाहन केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)