“जीसॅट-11′ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; भारतात इंटरनेटचा स्पीड वाढणार!

बंगळूरू: देशातील सर्वात अवजड उपग्रहाचे म्हणजेच “जीसॅट-11’चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहामुळे भारतात इंटरनेट क्षेत्रात क्रांती होईल, असा दावा केला जात आहे. या उपग्रहाच्या साहाय्याने भारतात प्रत्येक सेकंदाला 100 गीगाबाइटपेक्षा अधिक ब्रॉडबॅन्ड कनेक्‍टिव्हिटी मिळेल, असे म्हटले जात आहे. युरोपियन अवकाश केंद्र फ्रेंच गयाना येथून भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 2 वाजून 7 मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. हा उपग्रह जमिनीपासून 36 हजार किलोमीटर अंतरावर 30 मिनिटांनी स्थिरावला.

याआधी मार्च 2018मध्ये या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु त्यामध्ये शास्त्रज्ञांना अपयश आले. त्यानंतर तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने भारतीय अवकाश केंद्राने एप्रिलमध्ये याची पुन्हा तपासणी करण्यासाठी ते फ्रेंच गयाना येथून परत मागवले होते. त्यानंतर गेले सात महिने शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न करुन उपग्रहामधील त्रुटी दूर केल्या. उपग्रहातील तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करुन अखेर “जीसॅट-11’चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

या उपग्रहाचे वजन 5 हजार 854 किलोग्रॅम इतके आहे. यामध्ये 40 ट्रान्सपोंडर, त्यामुळे 16 गिगाबाइट/प्रति सेकंद इतका जलद इंटरनेट स्पीड मिळू शकतो. यामुळे देशाचे भौगोलिक क्षेत्र अवाक्‍यात येणार असल्याने ग्रामीण भागात इंटरनेट सेवा मिळणे सुलभ होणार आहे. देशात इंटरनेट क्रांती घडवून आणण्यासाठी 4 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. “जीसॅट-11’हे त्यापैकी तिसरा उपग्रह आहे.

जीसॅट-11 या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे. आपल्या अंतराळ कार्यक्रमातला महत्वाचा टप्पा, यामुळे दुर्गम भाग दूरसंवाद जाळ्याने जोडले जाऊन करोडो भारतीयांच्या जीवनात परिवर्तन घडेल. जीसॅट-11 या सर्वात अवजड, मोठ्या आणि अती प्रगत अशा उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे अभिनंदन, असे त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

कल्पक आणि यशस्वी कामगिरीसाठी नवनवी उद्दिष्टे ठेवणाऱ्या आमच्या शास्त्रज्ञांचा संपूर्ण भारताला अभिमान आहे. त्यांचे उल्लेखनीय कार्य प्रत्येक भारतीयाला स्फूर्तीदायी आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)