इंटरनेटच्या युगात तुमची “प्रायव्हसी’ खरंच सेफ आहे काय?

देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांच्या फोन मध्ये “युआयडी’ या नावाने सेव्ह झालेल्या एका अनोळखी क्रमांकामुळे एकच खळबळ उडाली. आपण तर हा नंबर सेव्ह केला नाही मग कुणी केला? असा प्रश्न अनेकांसमोर उपस्थित झाला.

“फेक न्यूज’ बनवण्याची सवय अंगवळणी पडलेली “थोर मंडळी’ ताडकन जागी झाली आणि हा नंबर व्हायरस आहे हा नंबर तुमच्या फोन मध्ये असल्याने अलान होईल फलान होईल अशा संदेशांनी व्हॉट्‌सअपच्या इनबॉक्‍सला पूर आला. आधीच “इथिकल हॅकर्स’ने नाकीनऊ आणलेल्या युआयडी (आधार) विभागाने आपला या प्रकरणामध्ये काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्याने संशयाची सुई “टेलिकॉम ऑपरेटर्स’कडे वळाली. परंतु त्यांनी देखील हात वर केल्याने संभ्रम निर्माण झाला. परंतु सरतेशेवटी स्वतः गुगल बाबांनीच ही “अगाध लीला’ आपलीच असल्याचे जाहीर केल्यानंतर या प्रकरणावर तात्पुरता पडदा पडला असला तरी इंटरनेटच्या युगात तुमची “प्रायव्हसी’ खरंच सेफ आहे काय? हा प्रश्न मात्र कायम राहिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या वर्ष-दोन वर्षातील इंटरनेटद्वारे ग्राहकांच्या परवानगी शिवाय त्यांच्या खाजगी माहितीचा वापर करण्याच्या प्रकरणांचा अभ्यास केला तर तुमची प्रायव्हसी धोक्‍यात आहे असेच काहीसे चित्र दिसत आहे. मध्यंतरी अशीच एक घटना पोर्टलॅंड येथील महिलेसोबत घडली. या महिलेने अॅॅमेझॉन या जगप्रसिद्ध ऑनलाईन साईटवरून “अॅॅमेझॉन इको’ नावाचे एक स्मार्ट स्पीकर विकत घेतले. या स्मार्ट-स्पीकरचा वापर करून आपण त्याला आपल्या आवाजाद्वारे आज्ञा देऊ शकतो. परंतु या महिलेला “अॅॅमेझॉन इको’चा वेगळाच अनुभव आला. कुठलाही आदेश न देता या स्मार्टस्पिकरने महिला व तिच्या पतीचे संभाषण रेकॉर्ड करून ते सदर महिलेच्या एक मैत्रीणीस पाठवले. हे प्रकरण माध्यमांच्या प्रकाशझोतामध्ये आल्याने अॅॅमेझॉनने याबाबत स्पष्टीकरण देताना अशा घटना दुर्मिळ असल्याचे म्हंटले होते. परंतु असे स्मार्ट स्पिकर्स एखादा संदेश पाठविण्यापूर्वी वापरकर्त्याकडून परवानगी घेतात. त्यामुळे अॅॅमेझॉनने दिलेले स्पष्टीकरण तोकडे पडताना दिसले. अशा प्रकारचे स्पिकर्स हे घरामधील संभाषण रेकॉर्ड करून आपल्या सर्व्हर्सला पाठवतात, पाठवलेल्या संभाषणांची पडताळणी करून मग अशा ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वस्तूंच्या जाहिराती पाठवल्या जातात असे आरोप देखील स्मार्टस्पीकर्स वर लागत आहेत. परंतु यामुळे ग्राहकांची खाजगी माहिती धोक्‍यात येत आहे एवढे मात्र नक्की.

इंटरनेटमुळे आपल्या खाजगी माहितीला दिला जाणारा छेद अशा अनेक उदाहरणांद्वारे स्पष्ट केला जाऊ शकतो. इंटरनेट आधारित सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या आपल्या खाजगी माहितीचा गैरवापर करणार नसल्याचा दावा करत असल्या तरी गुगल सारख्या नावाजलेल्या कंपनीने ग्राहकांना अनभिज्ञ ठेऊन सेव्ह केलेला नंबर त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. त्यामुळे इंटरनेट अथवा इंटरनेट आधारित उपकरणे हाताळताना ग्राहकांनीच त्यांच्याकडे अधिक डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. प्रत्येकच वस्तू स्मार्ट असावी हा आग्रह पुढे जाऊन धोक्‍याचा ठरू शकतो हे मात्र नक्की.

केम्ब्रिज अनॅलिटीका प्रकरण:
फेसबुकद्वारे जमा केलेल्या माहितीच्या आधारावर जगभरातील अनेक ठिकाणच्या निवडणुकांमध्ये केम्ब्रिज अनॅलिटीका या कंपनीने ढवळाढवळ केल्याचा धक्कादायक प्रकार मध्यंतरी उघडकीस आला. अमेरिकेमध्ये 2016 मध्ये झालेल्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी मतदारांच्या फेसबुक अकाउंट्‌स मधून अवैधरित्या माहिती गोळा करून त्याचा वापर अमेरिकेतील लाखो मतदारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी केल्याचा आरोप आहे. तसेच केम्ब्रिज अनॅलिटीका कंपनीचा भांडाफोड करणाऱ्या त्यांच्याच एका माजी कर्मचाऱ्याने कंपनीचा “ब्रेक्‍झिट’ मध्ये देखील हात असल्याचे सांगितले होते.

– प्रशांत शिंदे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)