नवी दिल्ली- येत्या 21 जून रोजी होणाऱ्या ‘योग’ ज्ञानशैलीचे महत्त्व लक्षात घेऊन आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2014 मध्ये ’21 जून’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. आणि याच पार्श्ववभूमीवर आज भारतीय जवानांची (ITBP) देखील लदाख मधील बर्फाळ प्रदेशात 18,000 फूटांवर ‘योग’ अभ्यास केला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या म हासभेत 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता.