International Tea Day : एक प्याली चाय !

‘कॉफी पीने वालों ये तुम्हारी खता नहीं, चाय क्या चीज होती है तुमको पता नहीं!’

१५ डिसेंबर म्हणजे जागतिक चहा दिन, कदाचित हा दिवस माझ्याप्रमाणे सर्वांनाच माहित असेल असे नाही. आजकाल ग्रीन टी, ब्लॅक टी असे नवनवीन अनेक बिनदुधाचे चहा आरोग्याच्या दृष्टीने चांगले म्हणून पिण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. या चहाची चव प्रत्येक ठिकाणी वेगळी लागते. कधी-कधी तर असे चहा कडू पण लागतात. ग्रीन टी, उलॉंग टी, ब्लॅक टी असे चहा आरोग्याच्या दृष्टीने पिण्याचे प्रमाण वाढले असले, तरी खऱ्या चहाची जी आहे, ती ह्या चहामध्ये येत नाही. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किमान दिवसातून कित्येक वेळा आपण चहा पीत असतो. आणि थंडीच्या काळात तर अनेक चहाप्रेमी पाहायला मिळतात. ब्रिटीशांच्या काळापासून चालत आलेली ही चहाची परंपरा आजदेखील तशीच आहे. आपण पितो तो चहा आणि बाहेर निर्यात करतो तो चहा यात खूप फरक आहे. काही चहाप्रेमींना तर चहाच्या नुसत्या सुगंधानेच उत्साह संचारतो. नंतर तो चहा पिताना आणखी द्विगुणीत होतो. म्हणून तर असा हा अमृततुल्य चहा दिवसातून कितीहीवेळा पिण्याची अनेकांची तयारी असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या दिवसाची सुरुवातच चहाच्या कपा पासून होते. चहा आपल्याला दिवसभरत अनेक रूपात प्यायला मिळतो, उदाहरण द्यायचं झालंच तर घरचं काम आटोपताना मध्येच हुक्की आली म्हणून प्यावासा वाटणारा चहा, ऑफिसमध्ये गेल्यावर मिळणारा चहा आणि मित्रांबरोबरचा टपरीवरचा चहा… खरंतर प्रत्येक चहाचा रंग-ढंग हा वेगळाच असतो. मित्रांबरोबर बसून निवांत गप्पा मारत चहा पिणे यामध्ये सुद्धा वेगळीच मजा असते. टपरीवरच्या एक प्याली चायची मजा तर निराळीच असते. तो चहा कसा करतात ते बघितलं की तो प्यावासाच वाटणार नाही. पण काचेच्या ग्लासातला त्या चहाचा घोट प्यायलावरच त्याची खरी मजा कळते. म्हणून तर कामगारांपासून ते सुटबुटवाल्यांनाही या चहाची भुरळ पडतेच पडते. मात्र, जगभरात जास्त प्यायल्या जाणारा हा चहा पिण्यासाठी आसुसलेला वर्ग मात्र टपरीवरच पाहायला मिळतो. सध्या चहाची ओळख ही टपरीपुरतीच मर्यादित राहिली नसून ती आता मोठं मोठ्या चहा शॉप्स मध्ये निर्माण झाले आणि चहाला सुपरहिट ग्लॅमर प्राप्त झालं. सुरुवातीच्या काळात चहा पिण्यासाठी शॉप्स आणि टपरी सोडून दुसरा पर्याय नव्हता. मात्र असे चहा शॉप सुरू झाल्यावर त्यांना पर्याय मिळाला. सध्याच्या लोकांना ही ‘चहा शॉप्सची’ थीम आवडायला लागली आहे. टपरीवचा चहा पिणारा माणूस आता चहा शॉपमध्ये येऊ लागला आहे. त्याचबरोबर मित्रांबरोबर कॉफी शॉपमध्ये बसून गप्पा मारणारा वर्ग हा चहा शॉप मध्ये येऊ लागला. काही चहावेड्या लोकांचे असं म्हणणं आहे कि, मित्रांबरोबर खरी गप्पा मारण्याची मज्जा ही चहाच्या टपरीवर आहे.

चहाचा इतिहास – असं म्हणतात की, इ.स. २७३७ पूर्वी चीनचा सम्राट ‘शैन नुंग’ यांनी उकळते पाणी गार करत ठेवले होते. तेव्हा काही पानं येऊन पडली. त्या पानांमुळे पाण्याला विशिष्ट असा रंग आला. अतिशय वेगळी असलेली ती चव सम्राटाला आवडली. तेव्हापासूनच चहाचा प्रसार सुरू झाला. सन ३५० ला चहा पिण्याचा पहिला उल्लेख तज्ज्ञांना सापडला. १६१० नंतर हळूहळू पाश्चात्त्य देशात चहाचा प्रसार व्हायला लागला. परदेशात तर चहा चांगलाच रूळला आहे. मात्र, भारताचा विचार करायचा झाल्यास, आसामच्या खास पत्तीयोसे बनलेल्या या चहाचा भारतात शोध लागला तो १८१५ साली. आसाममधले स्थानिक कबाईली लोक चहाची पाने उकळून पितात हे इग्रजांच्या लक्षात आले. मध्ये बराच काळ गेला. त्यानंतर भारताचे गर्व्हनर जनरल लॉर्ड बॅटिक यांनी १८३४ साली भारतात चहाचे उत्पादन कसे करता येईल याबाबत एक समिती स्थापन केली. त्यानंतर १८३५ साली आसाममध्ये चहाचे मळे सुरू झाले. त्यानंतर ब्रिटिशांनीच भारतीयांना चहा पिण्याची सवय लावली.

भारतामधील फेमस चहा-
ताजमहाल टी हाऊस, चायोज, टी व्हिला, वाघ बकरी टी लाऊंज, अरोमा, टीपॉट कॅफे, टी पॅलेस यु मी एण्ड चाय कप्पा अशा ठिकाणी मिळणारे हे चहा ५० रूपयांपासून २५० रूपयांपर्यंत आहेत. इथे मिळणाºया प्रत्येक चहाची चव वेगवेगळी आहे. चहाप्रेमींची गर्दी अशा ठिकाणी आता आवर्जून दिसते. भारतामधील सर्व जास्त प्रमाणात आसाम, दार्जिलिंगचा अस्सल चहा परदेशी विक्रीसाठी पाठवला जातो. आणि ते प्यायला लोकांना आवडते. सध्या चहाच्या पानांचा उपयोग खाद्यपदार्थातही केला जात आहे

चहा कुठेही प्यायला तरी त्यातून मिळणारं समाधान हे जास्त महत्वाचं असतं. सकाळपासून संपूर्ण दिवस ताजा आणि आनंदी जगायचा असेल तर चहावाचून दुसरा पर्याय नाहीच! बरोबर ना!

– ऋषिकेश जंगम


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)