पाकिस्तानला कोंडीत पकडणं भारताला पडलं महागात

नवी दिल्ली – पुलवामा येथे पाकिस्तानपुरस्कृत जैश-ए-मोहम्मद संघटनेद्वारे घडवून आणण्यात आलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी सर्वपरी प्रयत्न सुरू केले आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आजपासून सुरू होत असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानच्या दोन नेमबाजांना व्हिसा नाकारला. त्यानंतर पाकिस्तानकडून यासंदर्भात आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीकडे भारताची तक्रार करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी आॅलिम्पिक समितीने कठोर निर्णय घेत भारतामध्ये यापूढे कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानला कोडींत पकडण्याच्या नादात भारताकडून एक चूक झाली असून या चूकीची मोठी किंमत भारताला मोजावी लागणार आहे. आॅलिम्पिक समितीने भारताला विश्वचषकात 25 मीय रॅपिड पिस्तुल स्पर्धेसाठी विशेष कोटा बहाल केला होता. मात्र या प्रकरणानंतर आॅलिम्पिक समितीने हा कोटा काढून घेतला आहे. तसेच भारत सरकार भारतात आयोजित होणाऱ्या स्पर्धेत सहभागी असलेल्या प्रत्येक देशाच्या खेळाडूला प्रवेश देण्याबदल आणि आॅलिम्पिक समितीच्या नियमांचं पालन करण्याबाबत आॅलिम्पिक समितीला लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यत याप्रकरणावर भारतासोबत कोणतीही चर्चा करणार नसल्याचे आॅलिम्पिक समितीने भारताला सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)