सीएनएनच्या पत्रकारांशी अध्यक्ष ट्रम्प यांचा जाहीर वाद

खोट्या बातम्या पसरवत असल्याबद्दल ट्रम्प यांनी फटकारले

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा काही प्रसार माध्यमांवर मोठा राग आहे. त्यातच आज झालेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी सीएनएनच्या पत्रकारांनी अध्यक्ष ट्रम्प यांना काही आडवेतिडवे प्रश्‍न विचारल्याने अध्यक्ष ट्रम्प यांचा पारा चांगलाच चढला आणि त्यांनी या पत्रकाराला चांगलेच फटकारले. त्यावेळी या पत्रकारानेही त्यांना काही प्रश्‍न नेटाने विचारल्यानंतर दोघांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाल्याचे पहायला मिळाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकारानंतर सीएनएन वाहिनीने अध्यक्ष ट्रम्प हे सतत माध्यमांच्या विरोधात भूमिका घेत असल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली असून अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी मुक्त पत्रकारीतेचे रक्षण करण्याची शपथ घेतली आहे हे त्यांना विसरता येणार नाही याचीही आठवण करून दिली आहे. ट्रम्प यांची ही माध्यम स्वातंत्र्याविषयीची भूमिका देश हित विरोधी आहे असेही सीएनएनने म्हटले आहे.

अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी वाद घालणाऱ्या सीएनएन या वाहिनीच्या पत्रकाराचे नाव जिम अकोस्टा असे आहे. त्याने आज व्हाईट हाऊस मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी ट्रम्प यांना विस्थापितांविषयी प्रश्‍न विचारल्यानंतर ट्रम्प यांचे पित्त खवळले. तुला कोठे काय बोलायचे याची अक्कल नाही, तु खाली बस अशा शब्दात ट्रम्प यांनी त्याला खडसावले. तू सीएनएन मध्ये काम करतो आहेस ही त्या कंपनीला लाज आणणारी बाब आहे असा पाण उताराही त्यांनी केला. तुमचे चॅनल खोट्या बातम्या पसरवून केवळ आपले टीआरपी वाढवत असते. या वृत्तीने देश चालवता येत नाही असेही ट्रम्प यांनी त्यांना सुनावले. त्यानंतरही अकोस्टा याने त्यांना प्रश्‍न विचारणे सुरूच ठेवले.

अध्यक्षीय निवडणुकीच्यावेळी रशियाने हस्तक्षेप केला होता त्यावर तुमचे म्हणणे काय असा प्रश्‍न या पत्रकारांने त्यांना विचारल्यानंतर ट्रम्प चांगलेच खवळले आणि दोघांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झालेली पहायला मिळाली. नंतर या पत्रकाराचे ओळखपत्र व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांनी काढून घेतले. ट्रम्प यांनी त्याला खाली बसायला लाऊन दुसऱ्या पत्रकाराला प्रश्‍न विचारण्याची अनुमती दिली. तरीही अकोस्टा याने आपला हट्ट सोडला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)