श्रीलंकन अध्यक्षांनी केली संसद विसर्जित; 5 जानेवारीला निवडणुका होणार

कोलंबो, दि.9 -श्रीलंकेत निर्माण झालेल्या राजकीय आणि घटनात्मक पेचाच्या पार्श्‍वभूमीवर त्या देशाचे अध्यक्ष मैथ्रिपाला सिरीसेना यांनी शुक्रवारी संसद विसर्जित केली.तसेच 5 जानेवारीला निवडणुकाची घोषणा केली आहे. त्यामुळे श्रीलंकन देशाला मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

यूनाइटेड पीपुल्स फ्रीडम एलाइंस (यूरीएफए) युतीला शुक्रवारी सदनमध्ये आवश्यक बहुमत सिध्द न करता आल्याने सिरीसेना यांनी हा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, श्रीलंकन संसदेची मुदत ऑगस्ट 2020 मध्ये समाप्त होणार होती. काही दिवसांपूर्वी सिरीसेना यांनी रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदावरून हटवून त्या जागी महिंदा राजपक्षे यांची वर्णी लावली. ती कृती घटनाबाह्य असल्याची भूमिका घेत विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपदावरील दावा कायम ठेवला.

तर संसदेचे सभापती कारू जयसूर्या यांनी शक्तिपरीक्षेत बाजी मारल्याशिवाय राजपक्षे यांना पंतप्रधान मानणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे त्या देशात अभूतपूर्व पेच निर्माण झाला. आता निवडणुकीमुळे तो पेच संपुष्टात येऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)