भडकलेल्या वणव्याने पॅरेडाईज शहराचा विनाश;26,000 चे स्थलांतर

file photo

ऑरव्हिले (अमेरिका) – उत्तर कॅलिफोर्नियात भडकलेल्या वणव्याने एका शहरासह सिएराचा मोठा भाग भस्मसात केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गुरुवारी सकाळी कॅंप क्रीकजवळ केलेल्या एका शेकोटीचे रुपांतर बघता बघता मोठ्या वणव्यात झाले. वाळलेले रान आणि जोरदार वारे यामुळे वणवा बघता बघता नियंत्रणाबाहेर गेला. पॅरेडाईज शहरातील हजारो नागरिकांना सारेकाही सोडून प्राण वाचवण्यासाठी शहर सोडून जावे लागले आहे.

सुमारे 20,000 एकर प्रदेशावर पसरलेल्या वणव्याने त्या भागात काहीही शिल्लक ठेवेलेले नाही, असे राज्याच्या वन आणि अग्निशमन विभागाचे प्रवक्ते स्कॉट मॅक्‍लियन यांनी सांगितले. ताशी 50 मैल (80 किमी) वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने काही तासातच वणवा संपूर्ण प्रदेशात पसरला. अनेकांना आपली वाहनेही टाकून पळ काढण्याचे वेळ आल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लॉस एंजेलिसजवळील व्हेंच्युरा काऊंटीच्या दक्षिणेस लागलेला आणखी एक वणवा विझवणे जोरदार वाऱ्यामुळे अशक्‍य झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हा वणवा सुमारे 10,000 एकरांमध्ये पसरला आहे. वणव्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आपत्कालीन सेवा कर्मचारी कसून प्रयत्न करत असल्याचे, किमान एक हॉस्पिटल आणि फेदर रिव्हर हॉस्पिटल रिकामे करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

फेदर रिव्हर हॉस्पिटल नंतर जळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 26,000 लोकसंख्या असलेले संपूर्ण पॅरेडाईज शहर खाली करण्यात आले आहे. कॅलिफोर्नियात सध्या 14 वणवे धगधगत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुढील 24 तासात परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची शक्‍यता असल्याने कॅलिफोर्नियाच्या बहुतेक भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)