दहशतवादाच्या विरोधात संयुक्तराष्ट्रांची नवी उपाययोजना 

संयुक्तराष्ट्रे : संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुटेरेस यांनी दहशतवादावर नियंत्रण आणण्यासाठी नवे फ्रेमवर्क तयार केले असून त्यात त्यांनी शांतता, सुरक्षा, मानवतावादी व सक्षम विकास करणाऱ्या संघटनांची मदत घ्यायची ठरवली आहे. त्यासाठी संयुक्तराष्ट्रांतर्फे जगभरातील 36 संघटनांशी करार केले जाणार आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय क्रिमीनल पोलिस ऑर्गनायझेशन म्हणजेच इंटरपोल, जागतिक कस्टम्‌स ऑर्गनायझेशन इत्यादी संस्थांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय मानकानुसार आता नवीन मानवाधिकार कायदे तयार केले जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले. दहशतवादाला नियंत्रण घालण्यापेक्षा सुद्धा या नवीन धोरणात नवीन पिढी दहशतवादाकडे वळू नये यासाठीच उपाययोजना करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांनी म्हटले आहे की इसिस सारख्या संघटनांनी अनेक देशांतील युवक आपल्या संघटने मध्ये ओढून साऱ्या जगाच्या सुक्षेलाच धोका निर्माण केला आहे.

-Ads-

दहशतवादाच्या संबंधात करण्यात आलेल्या एका पहाणीचा दाखला देऊन त्यांनी म्हटले आहे की दहशतवादामुळे मरण पावलेल्यांच्या संख्येत 27 टक्के घट झाली असली तरी आज जगातील 67 देशांना दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांना तोंड द्यावे लागले असल्याने त्याची व्याप्ती खूप वाढली असल्याचे दिसून येत आहे. त्याला प्रभावी पायबंद घालण्याची गरज आज प्रकर्षाने निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)