आंतरराष्ट्रीय कुंफु वुशु स्पर्धेत मिताली बाणीस ब्रॉझपदक

पुणे – मिताली बाणी हिने आठव्या आंतरराष्ट्रीय कुंफु वुशु स्पर्धेत ब्रॉझपदक पटकावित कौतुकास्पद कामगिरी केली. तिने केलेल्या कामगिरीमुळेच भारतास या स्पर्धेत तिसरे स्थान घेता आले.

चीनमध्ये या जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मिताली हिच्यासह भारतीय संघाने कुंफु वुशु मार्शल आर्टस विभागात हे यश संपादन केले. मिताली ही पुण्यातील निलया एज्युकेशन ग्रुपमध्ये शिकत आहे. तिने या खेळातीन विविध तंत्राचा भरपूर सराव केला आहे. त्यातही तिने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करण्यावर भर दिला आहे. या खेळात यशस्बी होण्यासाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीबरोबरच लवचिकता व चापल्य याचीही गरज असते. त्यातही मिताली हिने स्वत:चा ठसा उमटविला आहे.

चीनमधील स्पर्धेत मिताली हिने सुरेख वैयक्तिक कौशल्य दाखविताना यांग स्टाईल ताइजिकानमध्ये 8.53 गुणांची कमाई केली. तसेच तिने 42 स्टाईल ताइजिकान या अन्य प्रकारात चौथे स्थान घेतले. तिने आपल्या संघाचे डावपेच व खेळाची पद्धत याचे योग्य रीतीने नियोजनही केले आणि भारतास उल्लेखनीय यश मिळवून दिले. अत्यंत जिद्द व चिकाटी याच्या जोरावर तिने या क्रीडा प्रकाराचा अभ्यास केला आहे. तिने ब्रॉझपदकाचे श्रेय आपले आईवडील व गुरुजनांना दिले. तिच्या या कामगिरीबद्दल तिचे सर्वथरातून अभिनंदन करण्यात आले.

वुशु या खेळाची सुरुवात 19 व्या शतकात चीनमध्ये झाली. हा क्रीडाप्रकार समकालीन चिनी मार्शल आर्टसचेच एक स्वरुप आहे. त्यांच्या खेळाडूंनी या खेळात वरचष्मा राखला आहे. भारतीय खेळाडूंनी गेल्या काही वर्षांमध्ये या क्रीडाप्रकारात लक्षणीय प्रगती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)