बॉक्‍सिंगचे टोकीयो ऑलिम्पिकमधील स्थान धोक्‍यात ?

टोकीयो  – बॉक्‍सिंग क्रीडा प्रकाराचे टोकीयो ऑलिम्पिकमधील स्थान धोक्‍यात आले आहे. हा खेळ प्रकार मागील काही काळापासून त्यांची वादग्रस्त निर्णय प्रक्रिया आणि आर्थिक अडचणीच्या बाबींमुळे चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग असोसीएशनच्या कार्यकारिणीला शिक्षा म्हणून या क्रीडाप्रकारचा टोकीयो ऑलिम्पिकमधील समावेश रद्द होऊ शकतो.

रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये पूर्ण 36 सामना अधिकारी आणि पंच हे बॉट फिक्‍सिंगमुळे वादात सापडले होते आणि त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर कार्यकारिणी समितीच्या निवडणुकांच्यावेळी देखील काही गैरप्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाच याने सांगितले की, आमाची कार्यकारिणी समिती या सर्व विषयांचा अवहाल तपासणार आहे . या आवाहलाच्यानंतर निकाल दिला जाईल. काही सामना अधिकाऱ्यानी चुका केल्या म्हणून आम्ही या खेळाच्या ऑलिम्पिक समावेशाला बंदी घालणार नाही. परंतु, आम्ही या गोष्टींना कमी लेखत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)