बॉक्‍सिंगच्या सहभागासाठी संयोजक करताहेत प्रयत्न

File Photo

टोकीयो : टोकीयो ऑलिम्पिकमधून बॉक्‍सिंग खेळाला बाद करू नये म्हणून ऑलिम्पिकचे संयोजक विशेष प्रयत्न करत असल्याचे टोकीयो ऑलिम्पिक 2020 चे मुख्य अधिकारी तोशिरो मुटो यांनी सांगितले आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने बॉक्‍सिंग आसोसिएशनमध्ये चाललेल्या अनेक वादांमुळे आणि घोटाळ्यांमुळे या खेळाला पुढील ऑलिम्पिकमध्ये बाद ठरवण्याचा विचार काल शुक्रवारी बोलून दाखवला होता. त्यामुळे या खेळाच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

-Ads-

मुटो पुढे बोलताना म्हणाले, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने बॉक्‍सिंगच्या सहभागावर निश्‍चित असा निर्णय घेतला नाही. त्यांचा याविषयीचा निर्णय पुढील जुन महिन्यात देणार आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांचीशी सल्ला मसलत काण्याची मुभा आहे. त्याचबरोबर त्यांचा समावेश झाला तर वेळेवर आमची भंबेरी उडू नये म्हणून आम्ही आमचे काम करत आहोत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)