सातारा शहरातील अंतर्गत वाहतुकीत बदल

संग्रहित छायाचित्र

सातारा – सातारा शहरातील पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटच्या कामामुळे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शहरातील अंतर्गत वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक होईल. ठिकठिकाणी पार्किंगसाठीही नियोजन करण्यात आले आहे.

पोवई नाक्‍याकडून मौतीचौकाकडे जाण्यास शाहू चौक ते मोती चौक एकेरी वाहतुकीसाठी वापरण्यात येईल. मोती चौक ते जुना मोटार स्टॅन्ड, शेटे चौक, पोलीस मुख्यालय हा मार्ग मोती चौकाकडून पोवई नाक्‍याकडे येण्यास सर्व वाहनांकरिता एकेरी वाहतुकीसाठी वापरावा. केसरकर पेठ ते लहुजी वस्ताद चौक येथून अलंकार हॉल, पोलीस करमणूक केंद्र बाजूस उजवीकडे वळण्यास बंदी राहील. एलबीएस कॉलेज बाजूकडून पवार टॉवर बिल्डींग येथून शाहू चौक बाजूकडे जाणारे रस्त्यावर डावीकडे वळण्यास बंदी राहील. एलबीएस कॉलेज बाजूकडून पवार टॉवर बिल्डींग येथून शाहू चौकाकडे डावीकडे वळण्यास बंदी राहील.

कमानी हौदाकडून शेटे चौकाकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक असेल. शेटे चौकातून शनिवार चौक बाजूस डावीकडे वळण्यास बंदी राहील. शनिवार चौकाकडून देवी चौकाकडे येण्यास एकेरी वाहतूक असेल. कमानी हौद बाजूस डावीकडे वळण्यास बंदी राहील. मौतीचौक ते गोलबाग- राजवाडा या रस्त्यावर दुहेरी वाहतूक राहिल. चांदणी चौक ते समर्थ मंदिर हा रस्ता अतिशय अरुंद असल्याने दोन जड वाहने एकाच वेळी त्या रस्त्यावरुन जाऊ शकत नाहीत, म्हणून हा रस्ता एसटी बसेस वगळता जड वाहनांसाठी दोन्ही बाजूने प्रवेश बंद राहिल.

राजधानी टॉवर्स समोर वनसाईड पार्किंग झोन तयार करण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर- शाहू चौक- अलंकार हॉल पोलीस करमणुक केंद्र ते मोती चौक रस्त्यांवर तसेच मोती चौक ते खण आळी- शनिवार चौक- पोलीस मुख्यालय रस्त्यांवर सम विष तारखांचे पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. प्रिया व्हरायटी कॉर्नर ते मनाली हॉटेल रस्त्यावर सम विषम तारखांचे पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. नवीन आरटीओ ऑफिस चौक ते केबीपी कॉलेजकडे जाणारे रस्त्यांवर सम विषम तारखांचे पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत.

राजपथावरील कमानी हौद ते शिर्के शाळा जाणाऱ्या मार्गावर कमानी हौद येथील रस्ता अरुंद असल्याने सर्व वाहनांकरिता “नो पार्किंग झोन’ तयार करण्यात आला आहे. शनिवार पेठ न्यू इंग्लिश स्कूल शाळेजवळील सोन्या मारुती मंदिरापासून 100 मीटर अंतरावर “फोर व्हिलर नो पार्किंग झोन’ तसेच सोन्या मारुती मंदिर ते नवीन मराठी शाळा समोरील गेटपर्यंत सर्व वाहनांकरीता नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. साईबाबा मंदिर चौक ते गोडोली पोलीस चौकी रोडवर नो पार्कींग झोन तयार करण्यात आला आहे. जड व अतिजड मालवाहू वाहनांना सातारा शहरातील बोगदा परिसर, मोळाचा ओढा, वाढे फाटा, खेड फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, देगाव फाटा, शिवराज फाटा येथून सातारा शहरात सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच दुकानात माल उतरविण्याकरीता येणारे मालवाहू वाहनांना रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत परवानगी राहील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)