“हुंडा” या विषयावर पुण्यात आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

पुणे: हुंडा विरोधी चळवळ, मुंबई ही सामाजिक संस्था हुंडा प्रथेविरोधात जनजागृतीसाठी ४६ वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहे. विशेषतः युवापिढीत जाणीव जागृती व्हावी यासाठी सातत्याने अथक प्रयत्न सुरूच आहेत. या उपक्रमांतर्गत पुणे येथे ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच भारती, एस एन डी टी आणि सिम्बिऑसिस विद्यापीठाशी संलग्न वरिष्ठ महाविद्यालयांसाठी मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयात “हुंडा” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या उपक्रमाचे यंदा २७ वे वर्ष आहे. गुरुवार दिनांक १३ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ९ वाजता खालील विषयांवर स्पर्धा होतील (१) कायद्याच्या मदतीने हुंडा निर्मूलन यशस्वी होईल का ? (२)सुदृढ समाजासाठी स्त्री पुरुष समानता (३) हुंडा निर्मूलनासाठी पुरुषांची भूमिका आणि योगदान (४) हुंड्याची वाढती प्रथा आणि भ्रष्टाचार (५) आधुनिक युगात महात्मा गांधींच्या विचारांची समर्पकता. विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिके, प्रशस्तिपत्रे , तसेच प्रथम क्रमांकाच्या महाविद्यालयाला “माई देशपांडे फिरता चषक” देण्यात येईल. पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन
जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी या उपक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती चळ्वळीतर्फे करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :आशा कुलकर्णी – महासचिव, हुंडा विरोधी चळवळ, मुंबई – ९८१९३७३५२२ /
९८१९५३९१९३ दूरध्वनी क्रमांक : ०२२-२६८३६८३४ / २६८३६१३२.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)