इंटरपोल अध्यक्षांना चीन सरकारने चौकशीसाठी ताब्यात घेतले 

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चौकशी सुरू असल्याचे केले स्पष्ट 
बिजींग: चीनचे एक मंत्री व इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलिस संघटनेचे अध्यक्ष मेंग हॉंगवेई यांना चीन सरकारनेच चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे स्पष्ट झाले होते. इंटरपोलच्या फ्रांस येथील मुख्यालयातून चीनला परत आल्यापासून ते बेपत्ता झाले होते. ते बेपत्ता झाले असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांना आम्हीच ताब्यात घेतले असल्याची घोषणा चीन सरकारने सोमवारी केली. मेंग हे चीनच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाचे उपमंत्रीही आहेत.
ते गेल्या गुरूवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने केली होती. त्यामुळे जगभर खळबळ माजली होती. ते आपल्या पत्नीसह फ्रांसमधील लिऑन शहरात वास्तव्याला होते. त्यानंतर ते चीनला गेले पण तेव्हापासून त्यांचा संपर्कच होऊ शकला नसल्याचे त्यांच्या पत्नीने म्हटले होते. चीन सरकारने त्यांच्यावर लाचखोरीचा आरोप ठेवला असून त्यांची या प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे चीन सरकारने स्पष्ट केले आहे. मेंग यांच्या ठावठिकाण्याविषयी चीनने सुरूवातीच्या काळात कमालीची गुप्तता पाळली होती त्यामुळे ते बेपत्ता झाल्याचे वृत्त पसरले होते.
दरम्यान इंटरपोलने आज जारी केलेल्या एका निवेदनात नमूद करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा तातडीने स्वीकारण्यात आला आहे असेही इंटरपोलने कळवले आहे. सन 2016 पासून ते इंटरपोलचे अध्यक्ष म्हणून काम करीत होते. या पदावर निवडले गेलेले पहिले चीनी अध्यक्ष होते. त्यांच्या निवडीचे चीनने स्वागतही केले होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)