हे सुद्धा नसे थोडके…! निर्णयाच्या दोन वर्षांनी सल्लागाराची नेमणूक

पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस-वेवर “इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम’ उभारणार

पुणे – पुणे- मुंबई द्रुतगती महामार्ग अर्थात एक्‍स्प्रेस-वेवरील अपघात रोखण्यासाठी “इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम’ उभारण्याचा निर्णय शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतला. आता शासनाने ही यंत्रणा राबविण्यासाठी सल्लागार नेमला आहे. विशेष म्हणजे, निर्णयाच्या तब्बल दोन वर्षांनी सल्लागार नेमला जाणार आहे.

-Ads-

द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ दोन वर्षांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर 7 जून 2016 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये द्रुतगती महामार्गावर वरील अपघात रेखण्यासाठी “इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम’ उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यामध्ये इंजिनीअरिंग, एज्युकेशन, एन्फोर्समेंट, आणि इमर्जन्सी या चार गोष्टींवर भर देण्याचे ठरले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर ही यंत्रणा उभारण्यासाठी सल्लागार समिती नेमली आहे.

राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने यासंबंधीची पहिली बैठक शनिवारी बांद्रा येथे आयोजित केली होती. यामध्ये महामंडळ, सल्लागार नेमलेल्याया संस्थेच्या अधिकाऱ्यांसह, परिवहन आयुक्तालय, राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक), सेव्ह लाइफ फाउंडेशन, आयआरबी आदीचे अधिकारी उपस्थित होते. ही पहिलीच बैठक असल्याने यामध्ये प्राथमिक चर्चा करण्यात आली. येत्या काळात आणखी बैठका होणार आहेत. द्रुतगती महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम उभारण्याचा निर्णय, त्या अंतर्गत कमांड सेंटरसह संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)