दलितांचा अपमान करणे ही तर काँग्रेसची परंपरा: अमित शहा 

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘दलित-विरोधी’ विचारधारा असल्याचा आरोप केल्यानंतर भाजपाचे पक्ष अध्यक्ष अमित शहा नरेंद्र मोदींच्या बचावासाठी उतरले आहेत. ट्विटरद्वारे राहुल गांधी यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेत अमित शहा यांनी “मोदी यांनी दलितांसाठीच्या एससी, एसटी ऍक्ट मध्ये सुधारणा केल्या, ओबीसी कमिशनची स्थापना केली तर याउलट काँग्रेसने नेहमीच दलित नेत्यांचा अपमान केला, मंडल आयोगाने मांडलेल्या शिफारशींना केराची टोपली दाखवत ओबीसींच्या हक्कांवर गदा आणली. एकप्रकारे दलितांचा अपमान करणे ही काँग्रेसची परंपराच राहिली आहे” असे आरोप त्यांनी लावले.

-Ads-

संबंधित बातमीएससी/एसटी बिलाच्या मुद्दयावरून राहुल गांधीचा प्रधानमंत्री मोदींवर हल्ला

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)