परवानगीच नाही तर पंतप्रधान शिवस्मारकाचे जलपूजन करतातच कसे? – धनंजय मुंडे 

मुंबई: युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक या राज्यात होणार होते. आज त्याच्या कामाला न्यायालयाने बंदी घातली आहे. कारण त्या संबंधीच्या परवानग्याच सरकारने घेतलेल्या नाहीत. मग जर परवानगीच नव्हती तर देशाचे पंतप्रधान या स्मारकाचे जलपूजन करतातच कसे?असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी विधानपरीषदेत उपस्थित केला.

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. या स्मारकाच्या समितीचे प्रमुख विनायक मेटेही येथे आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी या स्मारकाचे कंत्राट कशा चुकीच्या प्रकारे दिले आहे, हे सांगितलेले आहे. हे सरकार परवानग्या घेत नाही, स्मारकाची उंची कमी करते. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, असे वक्तव्य विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://www.facebook.com/NCPSpeaks/videos/465637677310672/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)