शेतकरी सन्मान योजनेचा बोजवारा : नांदेडमध्ये शेतकऱ्यांना पैसे परत करण्याचे निर्देश 

नांदेड – पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले होते. मात्र काही तासांच्या आतच बँकेने पैसे परत करण्याचे निर्देश शेतकऱ्यांना दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विर्जन पडण्याची शक्यता आहे. ही समस्या केवळ नांदेड जिल्ह्यापुरतीच मर्यादित नसून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बँकांनी शेतकऱ्यांकडून पैसे परत मागितल्याचे समजते आहे.

गोरखपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या थाटात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ केला होता. यावेळी देशातील १ कोटी १ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेचा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केल्याचा दावा करण्यात आला होता. यानुसार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही ८ हजार १८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित केले. मात्र नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या संचालक सुकन्या यांनी एका मेलद्वारे १ हजार २१०० शेतकऱ्यांचे पैसे परत घेण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, त्यामागचे कारण अद्यापही अस्पष्ट असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)