महानिरीक्षक येताच यवत पोलिसांची पळापळ

यवत – कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी आज (दि. 5) रोजी दौंड तालुक्‍यातील यवत पोलीस ठाण्याला भेट देत तेथील कामाचा आढावा घेत समाधान व्यक्‍त केले.

डॉ. सुहास वारके हे सोलापूरहून पुण्याकडे जात होते. यावेळी त्यांनी अचानक यवत पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. वारके यांनी पोलीस ठाण्याच्या कार्यालयीन कामाचा आढावा घेतला, तसेच पुणे-सोलापूर महामार्गावरून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात असतो. या पालखी सोहळ्याच्या पोलीस बंदोबस्ताची माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्याकडून जाणून घेत आढावा घेतला, तसेच दौंड तालुक्‍याची भौगोलिक माहितीही जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)