मादक पदार्थांचे सेवन टाळायला हवे (भाग १) 

डॉ. श्‍याम अष्टेकर

तरुणांमध्ये मादक पदार्थाच्या व्यसनाचे प्रमाण वाढतच आहे. या प्रमाणामध्ये वाढ होण्यासोबतच तरुण वैद्यकीय सल्ला किंवा उपचाराकडे कानाडोळा करत आहेत. 16 ते 22 वर्षे वयोगटातील तरुणांना मादक पदार्थाचे व्यसन असून या प्रमाणामध्ये 10 टक्क्‌यांनी वाढ होत आहे. आज तरुणांवर परिणाम करणारी वाईट गोष्ट म्हणजे मादक पदार्थाचे व्यसन. 

ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात. अफू व तीपासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश), विविध प्रकारची मद्ये वगैरे पदार्थाचा मादक पदार्थांत समावेश केला जातो. या पदार्थांचे दीर्घ काळ सेवन करीत राहिल्यास प्रथम त्यांची सवय जडते व नंतर व्यसन लागते. इंग्रजीत वापरण्यात येणाऱ्या छरीलीेंळली या संज्ञेत मोडणारे पदार्थ मुख्यत्वे वेदनाशामक आहेत; पण त्याचबरोबर त्यांमुळे एक प्रकारची गुंगी वा निद्रेची अवस्था, आसक्ती (व्यसनाधीनता) आणि आनुषंगिक परिणाम उद्‌भवतात. या पदार्थांना मादक वेदनाशामके अशीही संज्ञा वापरली जाते. या पदार्थांत अफू व तीपासून मिळणारे विविध पदार्थ, तसेच त्यांसारखे अर्धसंश्‍लेषित (नैसर्गिक पदार्थावर प्रक्रिया करून तयार केलेले; उदा., हेरॉईन) व संश्‍लेषित (घटक एकत्र आणून कृत्रिम रीतीने तयार केलेले) पदार्थ यांचा समावेश करण्यात येतो. प्रस्तुत नोंदीत याच पदार्थांचे विशेषत्वाने विवरण केलेले आहे. बेंझिड्रीन, फेटामीन व त्यांपासून बनविलेली काही द्रव्ये, झोपेची बार्बिच्युरेट औषधे, तसेच इतर शांतक व शामक (उत्तेजित अवस्थेचे शमन करणारी) औषधे यांचीही सवय लागणाऱ्या द्रव्यांत गणना होते; पण त्यांना मादक’ म्हणणे सयुक्तिक नाही बार्बिच्युरेटे; शांतके; शामके. मेस्कॅलीन व एलएसडी (लायसर्जिक ऍसिड डायएथिलअमाइड) यांसारख्या संभ्रमकारी द्रव्यांचाही वरील अर्थाने मादक पदार्थांत समावेश करण्यात येत नाही संभ्रमकारके. मादक पदार्थ हे शुद्धीत असलेल्या माणसाच्या वेदनाशमनासाठी उपलब्ध असलेल्या औषधांपैकी सर्वांत प्रभावी आहेत. इतर वेदनांपेक्षा काही विशिष्ट प्रकारच्या वेदनांवर (उदा. जठरांत्र मार्गातील म्हणजे जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून बनणाऱ्या अन्नमार्गातील -अथवा मूत्रवाहिनीतील) स्पिरीन, सिटामिनोफेन व तत्सम मादक नसलेल्या औषधांपेक्षा मादक पदार्थांचा उपचार अधिक उपयुक्त ठरलेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रकार व सामान्य गुणधर्म : 
मादक पदार्थांचे नैसर्गिक, अर्धसंश्‍लेषित व संश्‍लेषित असे वर्गीकरण करता येते.
नैसर्गिक अफू ही नैसर्गिक मादक पदार्थांचा प्रमुख उद्‌गम आहे. अफूचे मादक गुणधर्म फार प्राचीन काळापासून माहीत आहेत. औषधिक्रियाविज्ञानाच्या दृष्टीने अफूचे क्रियाशील घटक हे अल्कलॉइडे नावाची संयुगे आहेत. अफूतील सु. 25% वजन या घटकांचे असते. अफूमध्ये अनेक अल्कलॉइडे असली, तरी त्यांपैकी फारच थोड्यांचा (उदा. मॉर्फीन कोडीन पॅपॅव्हरीन, नोस्कॅपीन) वैद्यकीय चिकित्सेसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येतो. अफूतील मॉर्फीन हे अल्कलॉइड सर्वांत महत्त्वाचे असून नव्या वेदनाशामक मादक पदार्थाची क्रियाशीलता ठरविण्यासाठी मॉर्फिनचा मानक (प्रमाणभूत) म्हणून उपयोग करतात. मॉर्फिनाशी समान क्रियाशीलता असणाऱ्या मादक पदार्थांना काही वेळा ओपिएट म्हणतात. वेदनाशमनासंबंधीच्या संशोधनापैकी बरेचसे संशोधन मॉर्फिनासारखा प्रभावी वेदनाशमनाचा गुणधर्म असलेला पण त्याच्यासारखे अनिष्ट आनुषंगिक परिणाम नसलेला पदार्थ शोधण्यासाठी करण्यात येत आहे. अर्धसंश्‍लेषित व संश्‍लेषित मॉर्फीन वा कोडीन रेणूंमध्ये सापेक्षतः साधा संरचनात्मक बदल करून अनेक अर्धसंश्‍लेषित मादक पदार्थ (उदा. हेरॉईन) तयार करण्यात आले आहेत.
पूर्ण मॉर्फीन रेणूशी वा त्याच्या भागाशी संरचनात्मक सादृश असलेली पूर्णतः संश्‍लेषित संयुगेही (यांना काही वेळा ओपिऑइड असेही म्हणतात) मादक पदार्थ म्हणून उपयोगात आणतात.

औषधिक्रियाविज्ञान 
मादक पदार्थांचे औषधिक्रियाविज्ञान (बाह्य पदार्थ शरीरात दिले गेल्यास त्यांच्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास व विवेचन करणारे शास्त्र) सामान्यतः मॉर्फिनाप्रमाणेच असते. त्यांच्यातील भेद त्यांच्या क्रियेची समर्थता व त्यांच्यामुळे उद्‌भवणाऱ्या आनुषंगिक परिणामाची विविधता व त्यांचे प्रमाण यांत आढळतात. मादक पदार्थांचे परिणाम वेदनाशामक असण्याबरोबरच त्यांच्यामुळे एक प्रकारची सुखभ्रमाची अवस्था येते आणि या अवस्थेत गुंगी येऊन चिंता व मनाचा तणाव कमी होऊन शांत व स्थिरवृत्ती येते. कोणताही मादक पदार्थ सेवन केला, तरी त्याचे परिणाम त्याच्या मात्रेशी निगडित असतात आणि अधिकतर मात्रेत सर्वच मादक पदार्थांमुळे गाढ निद्रा येऊन मेंदूच्या सर्व कार्यांचे सर्वसाधारण मंदायन होते. अतिमात्रेमुळे ओढवणाऱ्या मृत्यूला श्वसन केंद्राचे होणारे मंदायन व परिणामी श्वसन क्रिया बंद पडणे ही कारणे असतात.

मादक पदार्थांचे सेवन टाळायला हवे (भाग २)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)