जिल्ह्यात वृक्षारोपणाची नावीन्यपूर्ण संकल्पना

ग्रीन फाउंडेशनचा उपक्रम; नवजात बालकांच्या मातेस वृक्षरूपी शुभेच्छा

लोणी काळभोर – महाराष्ट्रातील वनक्षेत्र 20 टक्‍यांवरून 33 टक्क्‌यांवर नेण्यासाठी ग्रीन फाउंडेशन हरित क्रांती या महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरूवात करण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याकरिता अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे ग्रीन फाउंडेशन संस्थापक अमित जगताप यांनी सांगितले

राज्यात निसर्गाचा समतोल ढासळत आहे, हे लक्षात आल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून ग्रीन फाउंडेशनचे युवा कार्यकर्त्यांनी राज्यभर वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. वृक्षारोपणाला चालना द्यावी, याकरिता यावर्षी विविध संकल्पना राबवून वृक्षारोणाचे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. जन्माला आलेली बालके, वाढदिवस, तरूणांचे झालेले विवाह, गावातील तरूणांना लागलेली नोकरी, दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

आनंद वृक्ष – दरवर्षी गावातील दहावी, बारावीतून विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्यांनी वृक्षारोपण करावे, तसेच वर्षभरात नोकरीवर लागलेले तरूण-तरूणी यांनी वृक्षारोपण करावे. माहेरची झाडी – गावात वर्षभरात विवाह झालेल्या कन्येच्या माहेरच्या लोकांनी फळझाडांची रोपे देऊन मुलींना ती रोपटे लावण्यास व त्यांचे संगोपण करण्यास बाध्य करणे, रोपटे देऊन शुभार्शिवाद देण्याचा संकल्प आहे. वाढदिवस – वर्ष भरातील एक आठवण वृक्ष स्वरूपात. स्मृति वृक्ष – वर्षभरात निधन झालेल्या गावातील व्यक्तीच्या कुटुंबाना रोपटे देऊन त्यांना श्रध्दांजली म्हणून रोपटे लावावे, अशा पद्धतीच्या संकल्पना राबविल्या जाणार आहेत.

या पार्श्‍वभूमीवर यावर्षी वृक्षारोपणाची सुरुवात लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जन्माला आलेले बालकांच्या मातांना वृक्षरूपी शुभेच्छा या अभिनव पद्धतीने केली आहे. यावेळी माजी उपसरपंच प्रशांत काळभोर, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दगडू जाधव, गणेश गायकवाड, सोमनाथ कुंजीर, संतोष सोनवणे, तीक कोठारी, राहुल कुंभार, सुजीत काळभोर, जयेश पवार, तीक मुळे आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)