वृद्धिमान सहा पुनरागमनाच्या तयारीला

डिसेंबर महिण्यात रणजीत खेळण्याची शक्‍यता

कोलकाता : गेल्या वर्षभरापासून खांद्याच्या दुखापतीमुळे क्रिकेट पासून दुर असलेला वृधीमान सहा डिसेंबर महिण्याच्या मध्यापर्यंत रणजी करंडक स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट मध्ये पुनरागमन करण्याची शक्‍यता सहाने वर्तविली आहे.

-Ads-

इस्ट बंगाल येथे माध्यमांशी बोलताना वृद्धिमान सहाने सांगितले की, सध्या मी पहिल्या पेक्षा जास्त तंदुरुस्त आहे. त्यामुळे मी सरावा वर लक्ष केम्द्रित करतो आहे. माझा सराव देखिल चांगला होत असून मला आशा आहे की, येत्या डिसेंबर महिण्याच्या मध्यापर्यंत मी रणजी स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट मध्ये पुनरागमन करु शकतो. त्या द्रष्टीने माझा सराव देखिल सुरु आहे. मात्र, सामना खेळण्या इतपत मी अद्याप तंदुरूस्त नाही. असेही त्याने यावेळी नमूद केले.

वर्षाच्या सुरुवातीलाच दक्षिण अफ्रिकेतील कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यानंतर खांद्याच्या दुखापती मुळे सहाला मायदेशी पाठवण्यात आले होते. त्यानंतर आयपीलच्या सामन्या दरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी मालिकेला देखिल मुकल्यानंतर चुकिच्या उपचारांमुळे त्याची दुखापत आणखिनच बळावल्याने तब्बल वर्षभरासाठी त्याला क्रिकेट पासून दुर रहावे लागल्याने त्याच्यासाठी हे वर्ष अत्यंत निराशाजनक गेले आहे.

सहा हा महेंद्र सिंग धोनीच्या कसोती मधिल निवृत्ती नंतर सहाहा भारतीय संघात पुर्नवेळ यष्टीरक्षकाच्या भुमिकेत खेळत होता. मात्र, त्याच्या दुखापती मुळे त्याच्या अनुपस्थितीत दिनेश कार्तिक, पार्थिव पटेल आणि ऋषभ पंतयांची चाचपणी करुन पाहिली. त्यात पंतने चांगली फलंदाजी केल्यामुळे सध्या त्याचे भारतीय संघातील स्थान पक्‍के समजले जात असल्याने सध्या सहाला भारतीय संघात जागा मिळवणे अवघड मानले जात आहे. त्यात आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात ऋषभ पंत आणि पार्थिव पटेलयांचा समावेश केल्यामुळे त्याचे सध्या भारतीय संघातील स्थान धोक्‍यात आले आहे.

त्यामुळे सहाल स्थानिक क्रिकेट मध्ये पुन्हा चमकदार कामगिरी करुन संघात आपले स्थान पुन्हा मिळवावे लागणार आहे. यासंदर्भात सहा म्हणाला की, दुखापतीनंतर पुनरागमन करणे अवघड असते. तुम्हाला स्थानिक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करुन संघातील आपले स्थान कमवावे लागते. त्या दृष्टीने मी सराव करत असून स्पर्धेमध्ये खेळण्याच्या दृष्टीने मी तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करतोय असेही त्याने यावेळी सांगितले.

यावेळी त्याने पुढे सांगितले की, दुखापत काळात क्रिकेट पासून दुर रहाणे खूप अवघड काम होते. मी त्यावेळी खूप कंटाळलो होतो. मात्र, मी त्यातून सकारात्मक विचार करताना स्वताःला पुनरागमनाच्या दृष्टीने प्रेरित करित राहिलो आणि मला आशा आहे की मी काहि दिवसात यशस्वी पुनरागमन करेल.

सहा हा गेल्या दहा वर्षातील सर्वोत्तम यष्टीरक्षक – गांगुली

गेल्या वर्षभरापासून खांद्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला वृद्धीमान सहा हा गेल्या दहा वर्सातील सर्वोत्तम यष्टीरक्षक असल्याचे वक्तव्य सौरव गांगुलीने कोलकातायेथे एका कार्यक्रमा दरम्यान केले असून दुखापतीतून यशस्वी पुनरागमन करेल अशी आशाही त्याने यावेळी व्यक्त केली.

महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती स्विकारल्यानंतर समर्थपने यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वृद्धीमान सहावर भारताच्या माजी कर्णधार सौरव गांगुलीने स्तुतीसुमने उधळली असून यावेळी गांगुलीने नवोदित यष्टीरक्षक र्षभ पंतची ही स्तुती करताना सांगितले की, ऋषभला अनुभवाची कमी असून जसा जसा अनुभव येईल तशी तशी त्याच्या कामगिरीत सुधारणा होत जाईल असेही त्याने यावेळी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)