सरकारचा महसूल कमी मात्र खर्च जास्त

संग्रहित छायाचित्र...

वित्तीय तूट 3.3 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – विद्यमान आर्थिक वर्षांसाठी अंदाजित केलेले 6.24 लाख कोटी रुपयांचे वित्तीय तुटीचे लक्ष्य अवघ्या आठ महिन्यांतच गाठले गेले आहे. महसुलात घट दिसत असताना खर्च मात्र कायम असल्यामुळे वित्तीय तूट 3.3 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वर्ष 2018-19 साठी सरकारने 6.24 लाख कोटी रुपयांचे वित्तीय तुटीचे लक्ष्य निश्चित केले होते. मात्र, एप्रिल ते नोव्हेंबर 2018 दरम्यान तुटीची मात्रा या लक्ष्याला ओलांडून 114.8 टक्‍क्‍यांवर गेली आहे. नोव्हेंबरअखेर प्रत्यक्षात वित्तीय तूट म्हणजे महसुली उत्पन्न आणि सरकारच्या खर्चातील तफावत ही 7.16 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीही याच कालावधीत तुटीचे प्रमाण तुलनेने कमी म्हणजे, संपूर्ण वर्षाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत 112 टक्के असे होते.

सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात वित्तीय तुटीचे प्रमाण चालू वित्त वर्षांकरिता 3.3 टक्के मर्यादेत राखण्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प मांडताना निर्धारित केले आहे. आधीच्या आर्थिक वर्षातील 3.5 टक्‍क्‍यांच्या तुलनेत तुटीची पातळी कमी राखणे हे सरकारच्या आर्थिक शिस्तीचे द्योतकही मानले जाते.

चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2018 पर्यत एकूण महसुली उत्पन्न 8.70 लाख कोटी रुपये झाले आहे. अर्थसंकल्पातील अंदाजाच्या तुलनेत ते निम्मे आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत जमा झालेल्या महसुली उत्पन्न हे या तुलनेत 53.1 टक्के अधिक होते.

नवीन अप्रत्यक्ष करप्रणाली अर्थात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मधून अपेक्षेपेक्षा कमी गोळा होत असलेला महसूल आणि एकंदरीत उत्पन्न कमी आणि खर्चात वाढ यामुळे वित्तीय तूट यंदा फुगत चालली आहे. चालू संपूर्ण वर्षांसाठी सरकारचे महसुली उत्पन्नाचे लक्ष्य 17.25 लाख कोटी रुपये आहे. तर नोव्हेंबर 2018 अखेर खर्च 16.13 लाख कोटी रुपये झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)