‘कुलदीप यादव’ची क्रमवारीत हनुमान उडी

आयसीसी टी-20 क्रमवारीत 23व्या स्थानी झेप

दुबई – भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने गेल्या काही सामन्यात केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीच्या बळावर आयसीसीच्या टी-20 मधिल गोलंदाजांच्या क्रमवारीत 14 स्थानांची हनुमान उडी घेताना 23 वे स्थान पटकावले आहे. तर, रोहित शर्माला देखिल तीन स्थानांची बढती मिळाली असून शिखर धवनने देखिल सहा स्थानांची बढती मिळवली आहे.

-Ads-

यावेळी कुलदीप सोबतच भारताच्या अन्य गोलंदाजांनाही बढती मिळाली असून भुवनेश्वर कुमारला 9 स्थानांचा फायदा झाला असून त्याने अव्वल 20 गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले असून सध्य तो 19व्या स्थानी पोहोचला आहे. तर बुमराहला पाच स्थानांचा फायदा झाला असून तो सध्या 21 व्या स्थानी पोहोचला आहे. तसेच, भारत विरुद्ध विंडीज दरम्यान झालेल्या अखेरच्या टी-20 सामन्यातील हिरो ठरलेल्या युझुवेन्द्र चहालने आपले चौथे स्थान परत मिळवले आहे.

तसेच, फलंदाजांच्या यादीत कर्णधार रोहित शर्माला 3 स्थानांचा फायदा झाला असून सध्या तो 7व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसऱ्या सामन्यात केलेल्या नाबाद 111 धावांच्या खेळीची त्याला या तीन क्रमांकाच्या बढती साठी फायदा झाला आहे. तसेच, विंडीज विरुद्धच्या अखेरच्या सामन्यात 92 धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनने पाच स्थानांची उडी घेत 16वा तर ऋषभ पंतने 41 गुण कमावत 100वे स्थान पटकावले आहे. लोकेश राहुल मात्र आपल्या चौथ्या स्थानी कायम आहे.

तर, सांघिक क्रमवारीत भारतीय संघ 127 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर, पाकिस्तान 138 गुणांसह पहिल्या स्थानी असून ऑस्ट्रेलियाचा संघ 118 गुणांसह तिसऱ्यास्थानी आहे तर इंग्लंडचा संघ देखिल 118 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. आता ऑस्ट्रेलिया संघाला चालू वर्षात चार टी-20 सामने खेळावयाचे असून जर हे चारही सामने ते जिंकले तर त्यांचे 126 गुण होतील आणि ते दुसऱ्या स्थानी पोहोचतील.

मात्र, जर ते हे च्वारही सामने हारले तर त्यांचे 112 गुण होतील आणि त्यांची चौथ्या स्थानी घसरण होईल. जर भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सर्व सामने जिंकले तर भारताचे 129 गुण होतील आणि त्यांचे दुसरे स्थान यावेळी अबाधीत राहिल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)