पदार्पणाच्या सामन्यातच शार्दुल ठाकुर जखमी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीत मुंबईकर शार्दूल ठाकूरला पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, अवघे 10 चेंडू टाकून त्याला दुखापतीमुळे तंबूत परतावे लागले. बीसीसीआयाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार तो पहिल्या दिवसाच्या संपूर्ण खेक़ासाठी उपलब्ध नसणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या माहितीनुसार, शार्दूलच्या दुखापतीची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. त्यामुळे तो आजचा (पहिला) संपूर्ण दिवस मैदानावर उतरणार नाही. उर्वरीत सामन्यात त्याच्या समावेशाबद्दलची माहिती नंतर देण्यात येईल. पृथ्वी शॉ पाठोपाठ मुंबईच्या शार्दुलने भारताच्या कसोटी संघात अखेर पदार्पण केले.

शार्दुल कसोटीत पदार्पण करणारा 294 वा खेळाडू आहे. 2016 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर शार्दूलला भारताच्या कसोटी संघात समाविष्ट केले होते, परंतु त्याला अंतिम संघात आज संधी मिळाली. मात्र, चौथ्या षटकाचा चौथा चेंडू टाकल्यानंतर शार्दूलला दुखापत झाली. त्यानंतर संघाचे फिजीओ पॅट्रीक फर्हर्ट हे मैदानावर आलले आणि त्यांनी शार्दूलला काही मिनिटांसाठी मैदानाबाहेर नेले. आर अश्विनने शार्दूलचे षटक पूर्ण केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
11 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)