#NZvIND 2nd T20 : भारतासमोर विजयासाठी 159 धावांचे आव्हान

ऑकलंड – दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघासमोर विजयासाठी 159 धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिला सामना जिंकत न्यूझीलंडचा संघ तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकणे भारतीय संघासाठी अनिवार्य आहे.

दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 158 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडच्या सुरूवातीच्या चार विकेटस झटपट गेल्या, त्यामुळे 7.5 षटकांत त्यांची 4 बाद 50 अशी अवस्था होती. मात्र त्यानंतर आलेल्या राॅस टेलर आणि काॅलिन डी ग्रैंडहोम यांच्या 77 धावांच्या भागिदारीमुळे न्यूझीलंडचा संघ भारतासमोर 159 धावांचे आव्हान उभ करू शकला. राॅस टेलरने 36 चेंडूत (3 चौकार) 42 धावा आणि काॅलिन डी ग्रैंडहोम 28 चेंडूत (1 चौकार, 4 षटकार) 50 धावा केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताकडून गोलंदाजीत क्रुणाल पांड्याने 4 षटकांत 28 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर खलील अहमदने 2 आणि भुवनेश्वर कुमार व हार्दिक पांड्याने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

https://twitter.com/ICC/status/1093777662273818625

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)