फायदेशीर शेतीसाठी पायाभूत विकास महत्त्वाचा – व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली: देशातल्या कृषी क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी प्रत्येकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. तसेच कृषी क्षेत्र शाश्वत आणि फायदेशीर करुन देशातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची गरज आहे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्‍त केले. यासाठी रचनात्मक बदल करतानाच केंद्र आणि राज्य सरकारांकडून या मुद्याला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्‍यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विजयवाडा येथे आयोजीत शेतकरी आणि वैज्ञानिक यांच्या संवादात्मक मेळाव्यात ते आज बोलत होते. नायडू म्हणाले, शेतकऱ्याला सक्षम करण्यामधे पायाभूत क्षेत्राची महत्वाची भूमिका अधोरेखित करतांना ग्रामीण रस्ते संपर्क सुधारणा, अधिक गोदामांची उभारणी, शीतगृहांची सुविधा, पाणी आणि वीजेचा निश्‍चित पुरवठा हे यामधले महत्वाचे घटक आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर पतपुरवठा करणे ही बाबही तितकीच महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
पिकांमधे वैविध्य आणणे आणि कृषीपूरक जोडधंदा हाती घेणे याबाबतही शेतकऱ्याला शिक्षण देण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांनी कृषीपूरक जोडधंदा हाती घेतला अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाल्या नाहीत, असे एमएएनएजीईने केलेल्या पाहणीत उघड झाल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतात आणि जगातल्या इतर भागातही कृषी क्षेत्राला मोठे प्रोत्साहन देण्याची आवश्‍यकता आहे. कृषी क्षेत्राशी निगडित अनेक मुद्यांसंदर्भात एकत्रित आणि समन्वयाने कृतीची गरज आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सिंचन, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विमा क्षेत्र बळकट करायला हवे, असे ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)