इन्फोसिसमधील रसिला राजू खून प्रकरणात आरोप निश्‍चित 

पुणे – गैरवर्तनाबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितल्याने हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत अभियंता रसिला राजू (रा. केरळ) यांचा खून केल्याप्रकरणात सुरक्षारक्षक भाबेन भराली साकिया (वय 27, रा. तातीबहार, जि. लखीमपूर, आसाम) याच्यावर आरोप निश्‍चित करण्यात आले आहे. भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) नुसार जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांच्या न्यायालयात हे आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत.

रसिला यांचा 24 जानेवारी 2017 रोजी हिंजवडीतील इन्फोसिस आयटी कंपनीत खून झाला होता. त्यानंतर भाबेन हा पसार होण्याच्या तयारीत असताना त्याला दुसऱ्या दिवशी पहाटे मुंबईतून अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी आणि या खटल्यातून वगळण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे. या गुन्ह्यात मंगळवारी आरोप निश्‍चित करण्यात आले. बचाव पक्षातर्फे ऍड. बी.ए.आलुर काम पाहत आहेत. तर सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)