दोन कंपन्यांची माहिती स्वीस बॅंकेकडून मिळणार 

केंद्र सरकारने दीर्घकाळ केलेल्या पाठपुराव्याचा सकारात्मक परिणाम 

नवी दिल्ली: स्वीस बॅंकेत काळा पैसा दडविलेल्या दोन भारतीय कंपन्यांच्या संशयास्पद खात्यांची माहिती देण्याची तयारी स्वित्झर्लंडने दाखविली आहे. दोन कंपन्यांबरोबरच आणखी तीन व्यक्‍तींची माहितीही मिळणार आहे. चौकशीत अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांची नावे घोषित करण्यात आलेली नाहीत. या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीवर सेबीने कारवाई केली असून दुसऱ्या कंपनीचे तामिळनाडूत लागेबांधे आहेत.

-Ads-

स्वीस सरकारच्या सरकारी परिपत्रकातही ही माहिती देण्यात आली आहे. काळा पैसा शोधण्यासाठी भारताला प्रशासकीय साहाय्य दिले जाईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, कंपन्या किंवा व्यक्ती यांची नेमकी माहिती देण्यात आलेली नाही. आता भारताला स्वीस सरकारशी संपर्क करून ही माहिती मिळवावी लागणार आहे. सदर कंपन्यांशी पत्रकारांनी संपर्क करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. मात्र यापैकी एका कंपनीचे समभाग शेअरबाजारात नोंद करण्यात आलेले नाहीत, असे समजते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)