इस्त्रो विषयी विद्यार्थ्यांना मिळणार माहिती

पिंपरी- भारतीय अवकाश विज्ञान संस्थेचे संस्थापक वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त (दि. 12) त्यांच्या कार्याविषयी तसेच इस्त्रोची माहिती विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. या उपक्रमासाठी चिंचवड एमआयडीसी येथील विकास शिक्षण संस्थेच्या श्री शिव छत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाची निवड करण्यात आली आहे.

या कार्यक्रमास पुण्यातील इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क, इस्त्रो अहमदाबाद आणि खगोल शिक्षण फोरम या संस्थांचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इस्त्रो सेलचे अध्यक्ष डॉ. एम. सी. उत्तम, जयंत जोशी, डॉ. सी. एम. नागराणी आणि वैज्ञानिक अरूणकुमार सिन्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी अवकाश विज्ञानातील विज्ञान फिल्म शो, इस्त्रोद्वार निर्मित चंद्रयान मोहीम, मंगळ मोहीम, प्रदर्शन आणि विज्ञान प्रश्‍न मंजूषा आदी कार्यक्रमांची विद्यार्थ्यांसाठी रेलचेल असणार आहे, अशी माहिती श्री शिव छत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अण्णासाहेब जाधव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)