व्याजदरात आणखी वाढ होणार

नवी दिल्ली : महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो या व्याजदरांमध्ये आणखी वाढ केली जाण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज एचएसबीसीने जारी केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.या महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात 0.25 टक्‍के वाढ केली होती. या वाढीनंतर रेपो दर 6.25 टक्‍के झाला आहे. किरकोळ महागाईबाबतचे अनुमानही रिझर्व्ह बॅंकेने 0.30 टक्‍क्‍यांनी वाढविले आहे. जागतिक पातळीवरील वित्तीय सेवा संस्था असलेल्या एचएसबीसीने म्हटले आहे की, व्याजदरात वाढ करण्यास आणखी वाव आहे.

एचएसबीसीचे आशियाई आर्थिक संशोधन विभागाचे सहप्रमुख फ्रेडरिक न्यूमन यांनी सांगितले की, भारतातील व्याजदर आणखी वाढू शकतात. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे व्यापारी समतोल आणि साठ्यांच्या किमतींवर दबाव आहे. त्याचा थेट परिणाम होऊन महागाई वाढेल. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेला व्याजदर आणखी वाढविण्याची गरज भासू शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अधिकृत आकडेवारीनुसार, मे महिन्यात किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर 4.87 टक्‍क्‍यांवर गेला असून, हा चार महिन्यांचा उच्चांक ठरला आहे. फळे, भाजीपाला, अन्नधान्ये आणि इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे महागाईत वाढझाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात किरकोळ क्षेत्रातील महागाई 2.18 टक्‍क्‍यांवर होती. जागतिक पातळीवर पतधोरणात मोठी तफावत दिसून येत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांत वाढीचा निर्धार व्यक्त होताना दिसत आहे. जगातील अन्य केंद्रीय बॅंकांना मात्र दरवाढीची घाई असल्याचे दिसत नाही. फेडरल रिझर्व्हकडून 2019 च्या अखेरपर्यंत 0.50टक्‍क्‍यानी वाढ केली जाऊ शकते, असे एचएसबीसीने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)