अन्नधान्य स्वस्त; मात्र इंधनाच्या किमतीत मोठी वाढ
 
व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता मावळू लागली 
नवी दिल्ली: जून महिन्यात अन्नधान्याचे दर काही प्रमाणात कमी होऊनही किरकोळ महागाईचा दर मात्र 5 टक्‍के इतका नोंदला गेला आहे. हा महागाईचा पाच महिन्यांचा उच्चांक आहे. यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. मे महिन्यात या महागाईचा दर 4.87 टक्‍क्‍यांवर गेला होता. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात पाव टक्‍क्‍यानी वाढ केली होती. मात्र, तरीही महागाईचा दर काही प्रमाणात वाढला असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी जून महिन्यात या महागाईचा दर केवळ 1.46 टक्‍के इतका होता.
मे महिन्यात अन्नधान्याच्या महागाईचा दर 3.1 टक्‍के इतका होता. आता तो 2.91 टक्‍के इतका आहे. जुन महिन्यात इंधनाच्या महागाईचा दर मात्र 7.74 टक्‍क्‍यांवर गेला आहे. रिझर्व्ह बॅंकेने सरकारशी समन्वय साधून महागाईचा दर 4 टक्‍के ठेवण्याचे ठरविले आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून या महागाईचा दर जास्त पातळीवर आहे. त्यामुळे आता रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात करण्याची शक्‍यता कमी असल्याचे बोलले जात आहे. या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेची याबाबत बैठक होणार आहे. 
महागाई वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे रिझर्व्ह बॅंक चालू आर्थिक वर्षात आणखी एकवेळा तरी रेपो दरात वाढ करण्याची शक्‍यता आहे. महागाईमुळे या अगोदरच्या पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात पावटक्‍का वाढ केली होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)