जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न; चार जवान शहीद

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या उत्तरी भागातून आज दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. तर चार जवान शहीद झाले आहेत.

बांदीपोरा जिल्ह्यातील गुजर सेक्टरमधून आठ दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलामध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. तर अन्य दहशतवाद्यांसाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी चार जवान शहीद झाले असून यामध्ये एका मेजरसहित तीन जवानांचा समावेश आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)