IND_Vs_WI T20 : अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ घोषीत

सिद्धार्थ कौलचा संघात समावेश; उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना विश्रांती

चेन्नई, दि. 9 – कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने टी-20 मालिकाही 2-0 अश्‍या फरकाने आपल्या खिशात घातल्यानंतर अखेरच्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून या सामन्यासाठी 12 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. यावेळी या सामन्यासाठी उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, नवोदित गोलंदाज सिद्धार्थ कौलचा समावेश केला गेला आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी-20 सामना 11 नोव्हेंबर रोजी चेन्नईत होणार आहे. भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर बीसीसीआयचे सध्याचे सचिव अमिताभ चौधरीयांनी सांगितले की, अखेरच्या सामन्यासाठी घोषीत केलेल्या संघातून उमेश, जसप्रीत आणि कुलदीपयांनाआगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दृष्टीने त्यांना पुरेसा आराम मिळावा आणि तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी अंतीम सामन्यासाठी संघातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मालिकेत आता पर्यंत भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले असून दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विंडीजच्या संघाला 150 धावांच्या आतच रोखले होते. यात बुमराह आणि कुलदीपयांनी विशेष कामगिरी केली होती. यावेळीकुलदीपने दोन सामन्यांमध्ये 5 बळी मिलवले आहेत. तर, बुमराहने 3 गडी बाद केले आहेत. तसेच, पहिल्या टी-20 सामन्यानंतर उमेशला दुसऱ्या सामन्यात वगळण्यात आले होते. तसेच, आयर्लंडयेथिल मालिकेत संघात पदार्पण करणारा सिद्धार्थ कौलला सामील केले असून त्याने आतापर्यंत केवळ दोनच सामने खेळले आहेत.

संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, शाहबाज नदीम आणि सिद्धार्थ कौल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)