जून महिन्यात औद्योगिक उत्पदनात वाढ

सरकारला दिलासा : मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्रांचे अर्थव्यवस्थेतील योगदान वाढले

नवी दिल्ली: जून महिन्याच्या औद्योगिक उत्पादनाची उत्साहवर्धक आकडेवारी आज सरकारने जाहीर केली आहे. त्यानुसार जून महिन्यात औद्योगिक उत्पादन 7 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. मे महिन्यात औद्योगिक उत्पादन 3.9 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. त्यामुळे आगामी काळात औद्योगिक उत्पादन वेग घेण्याची शक्‍यता आहे. सेवा क्षेत्रांची उत्पादकताही चांगली असल्यामुळे या आकडेवारीचा राष्ट्रीय उत्पादन वाढीला फायदा होणार असल्याचे सरकारने सांगितले.

-Ads-

एप्रिल ते जून या कालावधीसाठीचे औद्योगिक उत्पादन 5.2 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. त्या अगोदर अनेक महिने औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग फारच कमी झाला होता. जून महिन्यात म्यन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता 6.9 टक्‍क्‍यांनी वाढल्यामुळे एकूण उत्पादन वाढीला चांगला आधार मिळाला आहे. गेल्या वर्षी या क्षेत्राची उत्पादकता केवळ 0.7 टक्‍क्‍यांनी वाढली होती. एकूण औद्योगिक उत्पादनात या क्षेत्राचा वाटा तब्बल 77 टक्‍क्‍यांचा असतो.

जून महिन्यात ऊर्जा क्षेत्राची उत्पादकताही 8.5 टक्‍क्‍यानी वाढली आहे. जी की गेल्या वर्षी या महिन्यात केवळ 2.5 टक्‍के इतकी होती. आतापर्यंत खाण क्षेत्राची उत्पादकता फार कमी होती; मात्र आता या क्षेत्राची उत्पादकता 6.6 टक्‍क्‍यानी वाढली आहे.

गेल्या वर्षी या महिन्यात या क्षेत्राची उत्पादकता केवळ 0.1 टक्‍क्‍यानी वाढली होती. जून महिन्यात वीज उत्पादत तर 8.5 टक्‍क्‍यानी वाढले आहे. या आकडेवारीवर उद्योग आणि अर्थमंत्रालयीातल अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

आता अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रे नोटाबंदी आणि जीएसटीच्या प्रभावातून बाहेर पडली आहेत. त्यामुळे सेवा आणि औद्योगिक उत्पादन वाढू लागले आहे.

त्यामुळे आगामी काळात भांडवलाचा वापर वाढण्याची शक्‍यता आहे. पाऊस चांगला पडला असल्यामुळे या क्षेत्रातूनही राष्ट्रीय उत्पन्नाच्या अकाडेवारीला आधार मिळण्याची शक्‍यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील काळात औद्योगिक उत्पादन वाढत जाण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)