औद्योगिक उत्पादन घसरून 17 महिन्यांच्या निच्चांकावर

नवी दिल्ली – औद्योगिक उत्पादनात नोव्हेंबर महिन्यात मोठी घट होऊन ते केवळ 0.5 टक्‍के नोंदले गेले आहे. औद्योगिक उत्पादन वाढीचा हा दर 17 महिन्यांच्या निचांकी पातळीवर आहे. या अगोदर जून 2017 मध्ये औद्योगिक उत्पादन केवळ 0.3 टक्‍के इतके नोंदले गेले होते. एप्रिल ते नोव्हेंबर या काळात औद्योगिक उत्पादनाचा दर मात्र गेल्या वर्षाच्या 3.2 टक्‍क्‍यांच्या तुलनेत 5 टक्‍के इतका झाला आहे. त्यामुळे सरकारला थोडासा मिळालेला आहे.

मॅनूफॅक्‍चुरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढण्याऐवजी 0.4 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. ही चिंतेची बाब आहे. कारण औद्योगिक उत्पादनांत या क्षेत्राचा वाटा 78 टक्‍के एवढा असतो. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात या क्षेत्राची उत्पादकता 10.4 टक्‍क्‍यांनी
वाढली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खाण क्षेत्राची उत्पादकता थोडीशी वाढून 2.7 टक्‍के एवढी झाली आहे. ऊर्जा क्षेत्राची उत्पादकता वाढून 5.1 टक्‍के झाली आहे. भांडवली वस्तू क्षेत्राची उत्पादकता कमी होऊन 3.4 टक्‍के झाली आहे तर ग्राहक वस्तू क्षेत्राची उत्पादकता केवळ 0.6 टक्‍के नोंदली गेली आहे असे सांख्यिकी विभागाने सांगितले. त्यामुळे उत्पादकता वाढविण्याकडे आगामी काळात लक्ष द्यावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)