चार वर्षात लघुउद्योगात रोजगार निर्मिती वाढली 

नवी दिल्ली, दि.27-छोट्या उद्योगांनी गेल्या चार वर्षांत 4 कोटी रोजगार निर्माण केल्याचा दावा लघुउद्योग मंत्री गिरीराज किशोर सिंह यांनी केला आहे. 16 लाख लोकांना 2014-18 या काळात मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचे त्यांनी सांगितले.

आज लघुउद्योग दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी त्यांनी ही माहीती दिली. ती म्हणाले की, आपण दिलेली माहिती खरी असून आपण आव्हान देणाऱ्याना ती सिद्ध करून देण्यास तयार आहोत. त्याचबरोबर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यानी सोलार चक्र मोहीम गेल्या पंधरावड्यात जाहीर केली आहे. त्यामुळे पाच कोटी रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यानी सांगितले. आगामी काळातही रोजगार निर्मितीवर मोठ्या प्रमाणता भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोठ्या कंपन्यांमध्ये जास्त गुंतवणूक केल्यास त्या प्रमाणात रोजगार निर्माण होत नाही. मात्र छोट्या कंपन्या कमी गुंतवणुकीवर जास्त रोजगार निर्माण होतात. या कारणामुळे लघुउद्योजकांना भांडवल पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने मुद्रा योजना सुरू केली होती.
या योजनेला देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुणांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. यामुळे या उद्योगात बरेच रोजगार निर्माण झालेले आहेत. या क्षेत्रातून अनुत्पादक मालमत्ताही तुलनेने कमी निर्माण झाली असल्याचे बॅंकांनी सांगितले आहे, असे सिंह म्हणाले. आगामी काळातही छोटया उद्योगांना कर्ज देण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)