ट्रूस्पेस जॅगवॉर्स, जीएससी पॅंथर्स, डी लिंक चिताज उपांत्यपुर्व फेरीत

इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा

पुणे – ट्रूस्पेस जॅगवॉर्स, जीएससी पॅंथर्स व डी लिंक चिताज यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे.

-Ads-

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत गौरव कासटच्या नाबाद 58 धावांच्या खेळीच्या जोरावर कासट ड्रॅगन्स संघाने रेड बुल्सचास 7 गडी राखून पराभव करत आगेकूच केली. पहिल्यांदा खेळताना रेड बुल्स संघाने 6 षटकांत 3 बाद 78 धावा केल्या. यात तन्मय चोभेने 21 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 51 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. हे आव्हान कासट ड्रॅगन्स संघाने 5.5 षटकांत 1 बाद 82 धावा करून पूर्ण केले.

यामध्ये गौरव कासटच्या 20 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावा, तर, प्रतीक वांगीकरने 11 चेंडूत नाबाद 18 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी गौरव कासट ठरला. तर, अन्य एका सामन्यात कर्णा मेहता याच्या उपयुक्त 45 धावांच्या जोरावर जीएससी पॅंथर्स संघाने ओव्हन फ्रेश टस्कर्सचा 13धावांनी पराभव केला.

सविस्तर निकाल : साखळी फेरी :

जीएससी पॅंथर्स : 6 षटकांत 4 बाद 86 (कर्णा मेहता 45, यश परांजपे 27, श्रीनिवास चाफळकर 2-3) वि.वि. ओव्हन फ्रेश टस्कर्स: 6 षटकांत 6 बाद 73 (हर्षल गंद्रे 34, श्रीनिवास चाफळकर 21, राहुल गांगल 1-4, हर्षल जैन 1-7); सामनावीर-कर्णा मेहता.

रेड बुल्स: 6 षटकांत 3 बाद 78 (तन्मय चोभे नाबाद 51, अमित कुलकर्णी 12, नील हळबे 1-3, आकांश जैन 1-7) पराभूत वि. कासट ड्रॅगन्स: 5.5 षटकांत 1बाद 82 (गौरव कासट नाबाद 58, प्रतीक वांगीकर नाबाद 18, तन्मय चोभे 1-1);  सामनावीर-गौरव कासट.

गुडलक हॉग्स लिमये: 6 षटकांत 2 बाद 54 (देवेंद्र चितळे नाबाद 35, शिवकुमार जावडेकर 1-4, गौरव सावगावकर 1-7) पराभूत वि. अंजनेया ब्रेव बिअर्स: 5.5 षटकांत 3 बाद 55 (अंजनेया साठे 27, गौरव सावगावकर 10, अमोलल लिमये 2-10, समीर जोग 1-9); सामनावीर-अंजनेया साठे.

टायगर्स: 6 षटकांत 2 बाद 61 (मधुर इंगहाळीकर नाबाद 44, अक्षय ओक 1-10) पराभूत वि.डी लिंक चिताज: 6 षटकांत 4 बाद 62 (आत्मन बागमार नाबाद 34, कृष्णा मेहता 10, सिद्धार्थ साठ्ये 1-5, अमित कुलकर्णी 1-14); सामनावीर-आत्मन बागमार.

ट्रूस्पेस जॅगवॉर्स: 6 षटकांत 2 बाद 73 (रवी कासट 34, नकुल पटेल नाबाद 27) वि.वि.आर स्टॅलियन्स: 6 षटकांत 3 बाद 64 (हर्षद बर्वे 30, रोहित बर्वे 20, सोहम गांधी नाबाद 10, निरंजन गोडबोले 1-3, अनुज मेहता 1-12); सामनावीर-रवी कासट.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)